PM Modi Visit Austria 
ग्लोबल

Modi Visit Austria: ऑस्ट्रियाला भेट देणारे मोदी तिसरे PM; दिल्लीपेक्षा छोटा असणारा देश भारतासाठी का महत्त्वाचा?

PM Narendra Modi Visit Austria: ऑस्ट्रिया हा तसा छोटा देश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाला का भेट देत आहेत. याशिवाय, ऑस्ट्रिया भारतासाठी का खास आहे? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियानंतर ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले आहेत. मोदी हे ऑस्ट्रियामध्ये गेलेले भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत. याआधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला आहे. आता भारताचा पंतप्रधान ४१ वर्षानंतर ऑस्ट्रियामध्ये गेले आहेत. ऑस्ट्रिया हा तसा छोटा देश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाला का भेट देत आहेत. याशिवाय, ऑस्ट्रिया भारतासाठी का खास आहे? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

मोदी ऑस्ट्रियाला भेट देणारे तिसरे पंतप्रधान

भारताचे पंतप्रधान गेले चार दशकं ऑस्ट्रियामध्ये गेले नसले तरी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध चांगले राहिले आहेत. 'आज तक'च्या रिपोर्टनुसार, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८३ मध्ये ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांचा हा दुसरा दौरा होता. याआधी १९७१ मध्ये त्यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली होती. याआधी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू १९५५ मध्ये ऑस्ट्रियात गेले होते.

राष्ट्रपतींचे ऑस्ट्रिया भेट

भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियामध्ये गेले नसले तरी सरकारमधील अनेक नेत्यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. तत्कानील राष्ट्रपती केआर नारायणन हे १९९९ मध्ये , तर २०११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील या ऑस्ट्रियाला गेल्या होत्या. याशिवाय ऑस्ट्रियाचे महत्त्वाचे नेते देखील भारतात आले आहेत. २००५ मध्ये ऑस्ट्रियाचे तत्कानील राष्ट्रपती हेंज फिशर यांनी भारताला भेट दिली आहे. याशिवाय चान्सलर ब्रूनो क्रेस्की १९८० मध्ये, १९८४ मध्ये फ्रेड सिनोवाट्स भारतात आले होते.

दोन्ही देशात जुने व्यापारी संबंध

दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून व्यापारी संबंध आहेत. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण १६ व्या शतकापासून आहे. १९२१ आणि १९२६ मध्ये रवींद्रनाथ टॅगोर यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला होता. माहितीनुसार, जवळपास ३१ हजार भारतीय ऑस्ट्रियामध्ये राहत आहेत. यात जास्त करून पंजाब आणि केरळमधील लोकांचा समावेश आहे. विविध क्षेत्रामध्ये भारतीय तिथे काम करत आहेत.

दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या, बिहारपेक्षा छोटा

ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेकदा गल्लत केली जाते. पण, ऑस्ट्रिया हा युरोपमधील एक छोटा देश आहे. बिहारपेक्षा छोट्या क्षेत्रफळाचा हा देश आहे. याचे क्षेत्रफळ ८३,८७१ स्क्वेअर किलोमीटर इतके आहे. देशाची लोकसंख्या ९० लाख आहे. लोकसंख्याच्या दृष्टीने या देशाची लोकसंख्या दिल्लीपेक्षा कमी आहे.

राहण्यायोग्य देशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये

जगातील राहण्यायोग्य १० देशांच्या यादीमध्ये ऑस्ट्रियाचा समावेश होतो. त्यामुळेच या देशाची जगभर ओळख आहे. या देशात सुरक्षा, शिक्षा आरोग्य, पर्यावरण चांगले आहे. त्यामुळेच हा देश लोकांसाठी राहण्यायोग्य आहे. देशातील संस्कृती, पर्यटन स्थळे आणि संगीत यासाठी जगभरातून पर्यटक ऑस्ट्रियाला भेट देत असतात.

पंतप्रधान मोदींचे उत्साहात स्वागत

पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी चांगले होणार आहेत. ऑस्ट्रियामध्ये पंतप्रधान मोदी यांचे उत्साहात स्वागत झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रिया देखील भारतासोबत संबंध वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशात व्यापार किती?

भारत आणि ऑस्ट्रियामध्ये द्विपक्षीय व्यापार अडीच बिलियन डॉलरच्या जवळपास आहे. २०२१ मध्ये भारताने १.२९ बिलियन डॉलर इतकी निर्यात केली होती, तर १.१८ बिलियन डॉलरची आयात केली आहे. याचा अर्थ दोन्ही देशांमध्ये २.४७ बिलियन डॉलरचा व्यापार झाला आहे. रिपोर्टनुसार, हा व्यापार दिवसेंदिवस वाढत आहे. २०२३ मध्ये दोन्ही देशांमध्ये २.९३ बिलियन डॉलरचा व्यापार झाला आहे.

कोणत्या वस्तूंची आयात-निर्यात

इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशिन्स, रेल्वेचे सुटे पार्ट, कपडे, चपल्ला, ऑर्गेनिक केमिकल, आयर्न आणि स्टील इत्यादी वस्तू भारत ऑस्ट्रियाला निर्यात करत असतो. ऑस्ट्रियाकडून, स्टॅपल फायबर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वैद्यकीय वस्तू, केमिकल, प्लास्टिक इत्यादी आयात करत असतो. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियातील अनेक सीईओंची भेट घेणार आहेत. यावेळी सकारात्मक चर्चा होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशामध्ये व्यापार वाढू शकतो.

दोन्ही देशात स्टार्टअप ब्रिज लाँच

भारत आणि ऑस्ट्रियामध्ये याच वर्षी स्टार्टअप ब्रिज लाँच झाला आहे. यामुळे दोन्ही देशामधील व्यापाराला प्रोत्साहन दिले जात आहे. स्टार्टअप सुरु करणारे लोक दोन्ही देशांचा दौरा करत आहे. त्यामुळे स्टार्टअपच्या माध्यमातून देखील व्यापार वाढू शकतो. मध्य युरोपमधील ऑस्ट्रिया हा महत्त्वाचा देश आहे. त्यामुळेच भारतासाठी हा हे महत्त्वाचा आहे. दोन्ही देशात संबंध वाढल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा, तंत्रज्ञान, स्टार्टअप, मनोरंजन क्षेत्रामध्ये फायदा होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT