Pope Francis canada visit 
ग्लोबल

माफीसाठी पोप यांचा कॅनडा दौरा

मूलनिवासी समुदायातील लोकांना भेटणार

सकाळ वृत्तसेवा

व्हॅटिकन सिटी : कॅनडामधील निवासी शाळांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून मूलनिवासी लोकांवर आणि त्यांच्या मुलांवर अत्याचार झाल्याबद्दल या समुदायाची माफी मागण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस हे आज कॅनडामध्ये दाखल झाले.

गेल्या शतकात अनेक मूलनिवासी समुदायातील मुलांना निवासी शाळांमध्ये बळजबरीने भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना शाळेच्या आवारातच पुरण्यात आले होते. असे शेकडो मुलांचे सांगाडे गेल्या काही वर्षांत सापडल्यानंतर येथील समाजाने पोप यांच्याकडून माफीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत पोप हे कॅनडामध्ये आज दाखल झाले आहेत. पोप हे सहा दिवस कॅनडामध्ये असतील.

उद्या ते मास्कवॅसिस या शहरातील एर्मिनस्किन या निवासीशाळेला भेट देतील. यानंतर ते मूलनिवासी समुदायातील लोकांची भेट घेऊन त्यांची जाहीरपणे माफी मागणार आहेत. कॅनडामध्ये गेल्या शतकात निवासी शाळांमध्ये मुलांवर झालेल्या अत्याचारांमध्ये चार हजार ते सहा हजार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

कॅनडाला येण्याचे कारण

कॅनडामध्ये १८०० ते १९९६ या काळात ख्रिस्ती मिशनरींकडून निवासी शाळा चालविल्या जात होत्या. त्या शाळांमध्ये मूलनिवासी समुदायातील मुलांना बळजबरीने भरती करून घेतले जात होते. येथून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अत्याचार करून त्यांना पुरले जात असल्याचा पूर्वी आरोप झाला होता. यानंतर अनेक निवासी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी कॅनडामध्ये कॅमलूप्स येथील निवासी शाळेच्या आवारात २१५ कबरी सापडल्या होत्या. त्यानंतर देशभरातील अनेक बंद केलेल्या निवासी शाळांच्या आवारात अशा कबरी सापडल्या होत्या. एकूण १३९ शाळांपैकी निम्म्याहून अधिक शाळा कॅथोलिक चर्चतर्फे चालविल्या जात होत्या. त्यामुळे पोप यांनीच कॅनडामध्ये येऊन माफी मागावी अशी मागणी वाढत होती.

एप्रिलमध्येही मागिती होती माफी

कॅनडामधील निवासी शाळांमधील अत्याचारांमधून वाचलेल्या काही जणांनी एप्रिल महिन्यात व्हॅटिकन येथे जाऊन पोप यांची भेट घेतली होती. त्यावेळी पोप यांनी त्यांची तेथेच माफी मागून इतर उपस्थितांना धक्का दिला होता. ‘अनेक कॅथोलिक प्रचारकांनी तुम्हाला दु:ख पोहोचविले असून याची मला लाज वाटते. तुमच्या भावनांची आणि संस्कृतीचा त्यांनी आदर राखला नाही,’ असे पोप त्यावेळी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT