Queen Elizabeth Death News ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. डॉक्टरांनी राणीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करीत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला होता. मात्र, त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. ९६ वर्षीय राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या आहे. मात्र, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. अखेर त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
एलिझाबेथ द्वितीय (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी) यांचा जन्म २६ एप्रिल १९२६ रोजी लंडन झाला. त्या राष्ट्रकुल परिषदेमधील युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन द्वीपसमूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट, ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा, बार्बुडा, सेंट किट्स आणि नेव्हिस या १६ सार्वभौम देशांची राणी होत्या. त्या वैधानिक दृष्ट्या या देशांची सम्राज्ञी असली तरीही त्यांचे सामर्थ्य केवळ औपचारिक होते. इंग्लंडची राणी किंवा ब्रिटनची राणी याच नावाने एलिझाबेथ (Queen Elizabeth) ओळखली जायची.
दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सार्वजनिक सेवांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. साहाय्यक प्रादेशिक सेवेत भाग घेतला. त्यांनी विविध युद्धांमध्ये राज्याचे नेतृत्व केले. १९४७ मध्ये त्यांनी प्रिन्स फिलिपशी लग्न केले. त्यांना चार्ल्स, ऍनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड ही चार मुले झाली. एलिझाबेथ यांच्या राजवटीत युनायटेड किंगडममध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडले. ब्रिटिश वसाहतवादापासून आफ्रिकेचे स्वातंत्र्य, स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडच्या संसदांमध्ये विभाजन आदी बदल त्यांच्या कारकिर्दीत झाले.
६ फेब्रुवारी १९५२ पासून राणी
एलिझाबेथचे शिक्षण घरीच झाले. एडवर्ड आठवे यांनी राजीनामा दिल्यानंतर १९३६ मध्ये त्यांचे वडील ड्यूक जॉर्ज यांनी गादी सांभाळली. एलिझाबेथ यांचे वडील ड्यूक जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ यांना राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून राजघराण्यावर एलिझाबेथ यांची सत्ता आहे.
ब्रिटनमध्ये सर्वांत जास्त काळ राज्य करणारी राणी
६ फेब्रुवारी १९५२ रोजी त्यांच्या राज्याभिषेकानंतर एलिझाबेथ कॉमनवेल्थच्या अध्यक्ष बनल्या. त्यांचा राज्याभिषेक सोहळा हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता जो दूरदर्शनवर प्रसारित झाला होता. त्या जगातील सर्वांत जुनी राणी आणि ब्रिटनमध्ये सर्वांत जास्त काळ राज्य करणारी राणी आहे. ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी आजी राणी व्हिक्टोरियाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम मोडला. ब्रिटनमध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणारी सम्राट बनली.
जेम्स सहाव्यानंतर राणी बनल्या
आजोबांच्या कारकिर्दीत एलिझाबेथ सिंहासनाच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्याच्या आधी आजोबा एडवर्ड आठवा आणि वडील जॉर्ज सहावे हे होते. एडवर्ड व्ही यांनी घटस्फोटित वॉलिस सिम्पसनशी वादग्रस्त विवाहासाठी सिंहासन सोडले. परिणामी एलिझाबेथचे वडील राजा बनले आणि एलिझाबेथ स्पष्ट उत्तराधिकारी झाल्या. आई-वडिलांना मुलगा असता तर त्या उत्तराधिकाराच्या यादीत मागे पडल्या असत्या. परंतु, असे झाले नाही आणि जॉर्ज सहाव्यानंतर त्या इंग्लंडची राणी बनल्या.
एलिझाबेथ यांच्या मुलांचे नाव
चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्स
ऍनी, राजकुमारी रॉयल
प्रिन्स अँड्र्यू, ड्यूक ऑफ यॉर्क
प्रिन्स एडवर्ड, अर्ल ऑफ वेसेक्स
नातवांची नावे
प्रिन्स विल्यम, ड्यूक ऑफ केंब्रिज
प्रिन्स हॅरी ऑफ वेल्स
पीटर फिलिप्स
झारा फिलिप्स
यॉर्कची राजकुमारी बीट्रिस
यॉर्कची राजकुमारी युजेनी
लेडी लुईस विंडसर
जेम्स, व्हिस्काउंट सेव्हर्न
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.