global news  esakal
ग्लोबल

Queen Elizabeth: नेहरूंपासून मोदींपर्यंत, अशा होत्या राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी

1961,1983 आणि 1997 मध्ये एलिझाबेथ भारत भेटीवर

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनवर तब्बल 70 वर्ष राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी ठरल्या. भारताशीही त्यांचं नातं खास असं होतं. या महाराणीने तब्बल तीन वेळा भारताला भेट दिली होती. त्यावेळी भारताचं आदरातिथ्य पाहून त्या भारावून गेल्या होत्या. 1961, 1983 आणि 1997 मध्ये ते भारत भेटीवर आले होत्या. त्यांच्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी ताजमहालला भेट दिली तसेच महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

21 जानेवारी 1961 रोजी ब्रिटीश राजघराण्याच्या वंशज या नात्याने महाराणी एलिझाबेथ यांनी स्वतंत्र भारताला पहिली भेट दिली होती. भारताचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे भारतात शाही स्वागत करण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील पालम विमानतळावर उपस्थित होते.

या महाराणीला पाहण्यासाठी लाखो लोकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर गर्दी केली होती. त्यांचं स्वागत करताना भारतीय लोकांनी हातात ब्रिटन आणि भारताचे झेंडे घेत त्यांच्या नावाचा जयघोष चालवला होता.त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांनी राजघाटाला भेट देऊन भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर जगातील 7 वं आश्चर्य असलेला ताजमहाल पाहण्यासाठी हे शाही जोडपं आग्र्याला गेलं. याशिवाय त्यांनी तत्कालीन बॉम्बे (मुंबई), बनारस (वाराणसी), उदयपूर, जयपूर, बंगलोर (बेंगळुरू),मद्रास (चेन्नई) आणि कलकत्ता (कोलकाता) या शहरांनाही भेटी दिल्या.भारतभेटीवर आलेल्या या महाराणींना कुतुबमिनारचे कलात्मक मॉडेल भेट देण्यात आले तर प्रिन्स फिलिप यांना चांदीचा मेणबत्ती स्टँड देण्यात आला.

दुसऱ्या दौऱ्यात मदर तेरेसा यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट' सन्मान

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी 1983 मध्ये भारताला दुसरी भेट दिली. नऊ दिवसांच्या या दौऱ्यात महाराणींनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनच्या महाराणी भारतभेटीवर आल्या होत्या.महाराणींचं आगमन एखाद्या सणापेक्षा कमी नव्हतं. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस 6 महिन्यांत बांधून पूर्ण करण्यात आले. महाराणीच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजशिष्टाचार शिकवण्यात आले. राणी भारतीय अन्न खात नसल्यामुळे तिच्या आवडीनुसार अन्न शिजवण्यासाठी खास शेफ नेमण्यात आले.

बातम्यांमध्ये तर सर्वत्र महाराणी एलिझाबेथच्याच चर्चा होत्या. त्यांनी कोणता ड्रेस परिधान केलाय, त्यांच्या ड्रेसचा रंग कोणता होता? गाऊन कुठून शिवून घेतला ? असे मथळे असलेल्या बातम्या त्यावेळच्या टॉपच्या वृत्तपत्रात छापून येत होत्या.महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भारताच्या दुसर्‍या भेटीत मदर तेरेसा यांना ब्रिटीश राजदरबाराने आयोजित केलेल्या समारंभात ऑर्डर ऑफ मेरिट देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य, कला, कला, विज्ञान आणि सैन्यात चांगले काम करणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो.1983 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी ब्रिटीश शाही जोडप्याचे स्वागत केले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्या आगमनानिमित्त राष्ट्रपती भवनात भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची शेवटची भारत भेट..

1997 मध्ये त्यांनी शेवटचा भारत दौरा केला. त्या 13 ऑक्टोबरला पती प्रिन्स फिलिपसोबत भारतात आल्या. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचे स्वागत केले. हा दौरा सुद्धा संस्मरणीय ठरला, कारण याच वर्षी ब्रिटनपासून भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. भारताच्या या आनंदात सामील होण्यासाठी ब्रिटनची महाराणी आल्या होत्या.आपल्या शेवटच्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. यादरम्यान त्यांनी पायात चप्पल न घालता, पांढरे मोजे घालून गुरुद्वारात प्रवेश केला.

महाराणीच्या या भेटीचीही खूप चर्चा रंगली. कारण त्यांनी अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. असं करणाऱ्या त्या ब्रिटिश राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ''2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.'' असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहे

महाराणीला भारताच्या आदरातिथ्याबद्दल आकर्षण होतं..

जागतिक नेत्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आयोजित केलेल्या भव्य मेजवानीच्या वेळी, त्यांनी भारताचं कौतुक केलं. त्या म्हटल्या होत्या, 'प्रिन्स फिलिप आणि माझ्या भारत भेटीच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. भारतीय लोकांचा आदरातिथ्य आणि भारतीय लोकांचे प्रेम, त्यांची विविधता सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT