Bangladesh Student Protest sakal
ग्लोबल

Bangladesh Student Protest : बांगलादेश सीमेवर दक्षतेचा इशारा ; दोन्ही देशांदरम्यानची रेल्वेसेवा स्थगित

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बांगलादेशातील आंदोलनाच्या भडक्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना पळ काढावा लागल्यानंतर भारताने विविध आघाड्यांवर सावध पवित्रा घेतला. सुमारे ४ हजार ९६ किलोमीटर लांब भारत-बांगलादेश सीमेवर तैनात जवानांना सीमा सुरक्षा दलाने अतिदक्षतेचा इशारा दिला, तर भारत-बांगलादेशदरम्यानच्या  सर्व  रेल्वे सेवा  स्थगित केल्या. बांगलादेशाचे रहिवासी  असलेल्या भारतीय नागरिकांनी  त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. 

बांगलादेशात सत्तापालट झाल्यामुळे सीमा सुरक्षा दलाने ४०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम या पाच राज्यांना लागून असलेली उभय देशांदरम्यानची सीमा ही जगातील पाचवी सर्वांत लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

दोन दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले सीमा सुरक्षा दलाचे प्रभारी महासंचालक दलजितसिंह चौधरी आणि त्यांचे सहकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोलकत्यात दाखल झाले आहेत.

प्रवास टाळा, सुरक्षित रहा

बांगलादेशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांनी  बांगलादेशाचा  प्रवास टाळण्याचा आग्रही  सल्ला दिला आहे. बांगलादेशातील सर्व भारतीय नागरिकांनी अतिसावधानता  बाळगून आपल्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात तसेच आणीबाणीच्या स्थितीत बांगलादेशातील भारतीय नागरिकांनी+८८०१९५८३८३६७९/८० तसेच +८८०१९३७४००५९१ या दूरध्वनी क्रमांकावर ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले.

सुरक्षेत वाढ

बांगलादेश सोडून पळ काढणाऱ्या शेख हसीना दिल्लीत येण्याची शक्यता गृहित  धरुन दिल्लीच्या चाणक्यपुरीतील बांगलादेशाच्या  उच्चायुक्तालया भोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

आंदोलनाचे मूळ कारण

सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांच्या नातेवाइकांना ३० टक्के आरक्षण देण्याच्या पद्धतीविरोधात निदर्शनांनी आंदोलनाला सुरुवात. या पद्धतीचा शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनाच अधिक फायदा असल्याचा आंदोलकांचा दावा. आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कोटा पाच टक्क्यांवर आणला. हिंसक आंदोलन शमण्याच्या अपेक्षेने सरकारनेही निर्णय मान्य केला. मात्र, हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या हसीना यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

सरकारचे म्हणणे व कारवाई

आंदोलनात विद्यार्थी नसून दहशतवादी असल्याचे आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट असल्याचे म्हणत शेख हसीना यांनी आंदोलकांवरच टीका केली. आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली. अवामी लीगचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष. पोलिसांकडून बळाचा वापर

घटनाक्रम

५ जून २०२४

बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नातेवाईक आणि इतरांसाठी ५६ टक्के कोटा देण्यास उच्च न्यायालयाची मान्यता. निर्णयाविरुद्ध आंदोलन सुरू. आधी ही मर्यादा ३० टक्के होती.

१ जुलै

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाकेबंदी सुरू केली, रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली. सार्वजनिक क्षेत्रांतील नोकऱ्यांसाठी कोटा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची त्यांची मागणी. सत्ताधारी सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्यांकडेही याबाबतची मागणी.

शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे फेटाळून लावले व विद्यार्थी त्यांचा वेळ वाया घालवत आहेत, अशी टिपणी केली.

आंदोलकांकडून शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी.

१२ जुलै

आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी देशभरात रास्तारोको केले. दुकाने व गाड्या जाळल्या.

१४ जुलै

रझाकार अशा शब्दांत

पंतप्रधान शेख हसीना यांनी

आंदोलनकर्त्यांची संभावना केली.

१६ जुलै

ढाका येथे निदर्शक आणि सरकार समर्थक यांच्यातील संघर्षानंतर सहा जणांचा मृत्यू झाला. या नंतर हिंसाचार वाढला. शेख हसीना सरकारने देशभरातील शाळा आणि विद्यापीठे बंद केली.

१८ जुलै

पंतप्रधान शेख हसीना यांचे शांततेचे आवाहन विद्यार्थ्यांनी फेटाळून लावले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली.

काही सरकारी इमारतींसह बांगलादेश टेलिव्हिजनचे मुख्यालय आंदोलकांनी जाळले. सरकारने इंटरनेट सेवा बंद केली. संचारबंदी असूनही पोलिसांबरोबरील चकमकी सुरू होत्या. त्यात ३२ जण मृत्युमुखी पडले.

१९ जुलै

देशभरातील आंदोलने अधिक तीव्र झाली. एकाच दिवसांत ६०हून अधिक जणांचा मृत्यू

२१ जुलै

बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयात आरक्षण प्रकरणाची पुन्हा सुनावणी. सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. केवळ सात टक्के कोटा लागू गेला. आंदोलकांचे मात्र यामुळे समाधान झाले नाही. आंदोलन सुरूच.

२६ जुलै

आंदोलनाशी संबंधित काही विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केली.

४ ऑगस्ट

आंदोलकांकडून असहकार आंदोलन सुरू. लाखो लोक पुन्हा सरकारी समर्थकांशी भिडले, परिणामी १४ पोलिस अधिकाऱ्यांसह ६८ जणांचा मृत्यू झाला. माजी लष्करप्रमुख जनरल इक्बाल करीम भुईया यांनी सरकारला सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले. सध्याचे लष्कर प्रमुख वकेर-उझ-झमान यांनी लष्कर "नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे" असे सांगितले.

५ ऑगस्ट

आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी समर्थकांना "अंतिम निषेधासाठी" ढाक्यात एकत्र येण्याचे आवाहन केले. हजारो आंदोलकांनी गृहमंत्री, पंतप्रधानांचे कार्यालय व घरात घुसखोरी व जाळपोळ केली. त्यावेळी पंतप्रधान शेख हसीना घरात नव्हत्या.

  • शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याचे लष्कराकडून जाहीर

  • पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेर पळाल्या.

  • शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर प्रयत्न करेल : लष्करप्रमुख

  • देशातील राजकीय पक्षांशी लष्कराची चर्चा, १८ सदस्यीय हंगामी सरकारचा प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT