Ram Mandir Pran Prathistha different states contributed to ram temple 
ग्लोबल

Ram Mandir : जगभरात श्रीरामाचा जयघोष! सुमारे 40 देशात साजरा झाला आनंदोत्सव

यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे भारतीय नागरिकांनी गर्दी केली हा संपूर्ण परिसर रामगीत ऐकत बेभान झाला होता.

रोहित कणसे

वॉशिंग्टन : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवरून जगभरातील बहुतांश मंदिरात उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेसह आशिया, युरोपीय देशांतील मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनिवासी भारतीय नागरिकांनी सुमारे चाळीस देशांत स्थानिक वेळेनुसार प्राणप्रतिष्ठेनिमित्त आनंदोत्सव साजरा केला. न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे भारतीय नागरिकांनी गर्दी केली हा संपूर्ण परिसर रामगीत ऐकत बेभान झाला होता.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्याची पद्धत अनोखी आणि आधुनिक पाहवयास मिळाली. टाइम स्क्वेअर येथील भव्य पडद्यावर श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले आणि या चित्राकडे पाहत हातातील भगवे झेंडे उंचावत नागरिकांनी घोषणा दिल्या. यादरम्यान टाइम्स स्क्वेअर येथे ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिराच्या सदस्यांनी लाडू वाटप केले.

टाइम्स स्क्वेअर येथे काही बिलबोर्ड हे श्रीरामाचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत प्रभू रामाचे चित्र दाखवण्यात आले.

वॉशिंग्टन डीसीचे उपनगर व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स कौंटीत एसव्ही लोटस मंदिरात शीख, मुस्लिम आणि पाकिस्तानी अमेरिकी समुदायाचे नागरिक सहभागी झाले. हा सर्व समुदायासाठी आनंदाचा क्षण असून एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेतील शीख नागरिक जस्सी सिंग यांनी हा खूप आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शीख समुदायाकडून आणि अमेरिकेतील शिखांकडून भारतात श्रीराम मंदिराच्या अनावरणानिमित्त हिंदू बंधू आणि भगिनींना खूप शुभेच्छा. अमेरिकेतील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन हा आजचा आनंदाचा आणि पवित्र दिवस साजरा करत आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT