तुम्हाला उंदीरांपासून चिड आहे? ते दिसताच त्यांना मारायला तुम्ही धावता? आणि तुमचे संवाद कौशल्य चांगले आणि व्यक्तीमत्व बदमाश आहे. तर, तुमच्यासाठी वर्षाला थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 1.3 कोटी रुपये वर्षीय पगाराच्या नोकरीची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे सरकारतर्फे या कामासाठी विशेष भरती जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेले न्यूयॉर्क शहरातील अनेक लोक उंदरांच्या उच्छादामुळे त्रस्त झाले आहे. या दहशतीपासून नागरिकांची आणि शहराची सुटका व्हावी यासाठी 'रॅट जार' च्या जागांवर भरती सुरू करण्यात आला आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या प्रशासनाने शहरातील उंदीरविरोधी मोहीम यशस्वी करण्यासाठी उंदीर पकडणाऱ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘director of rodent mitigation’ अशा शिर्षकाने ही नोकरीची जाहीरात करण्यात आली आहे. परंतु, या कामाला रॅट जार असे नाव देण्यात आले आहे. या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 120,000 डॉलर म्हणजेच 97 लाख ते 170,000 डॉलर म्हणजेच 1.3 कोटींचे वार्षिक वेतन दिले जाणार आहे.
पात्रता काय?
उंदीर पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या जागांसाठी काही अटीदेखील टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये हे काम 24/7 असणार आहे. तसेच हा काम करताना पेशन्स असणेदेखील गरजेचे असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी डाटा संकलित करणे तंत्रज्ञानातील नाविन्य, कचरा व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर उंदीर मारणे आदी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय नोकरीसाठी अर्ज करणारी व्यक्तीमत्व बदमाश असल्यासारखे असावे. तसेच उमेदवाराकडे बॅचलर पदवी असावी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा पाच ते आठ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शहरातील सभागृहात लोकांना संबोधित करावे लागेल. यासाठी विनोदबुद्धी देखील असणे आवश्यक आहे.
करोडो रुपये खर्च करूनही त्रास कायम
वास्तविक, न्यूयॉर्क शहरातील अनेक ठिकाणी उच्छाद घातलेल्या उदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी उंदीर दिसून येत आहेत. उंदरांमुळे अनेक आजार पसरण्याचा धोका आहे. या सर्वबाबी लक्षात घेत उंदरांना पकडण्यासाठी आता विशेष भरती केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.