लंडन - ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करीत असलेल्या कोरोनावरील लसीने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. १०७७ लोकांवरील चाचण्यांचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. आता परिणमाकराकता सिद्ध करण्यासाठी व्यापक चाचण्या सुरू होत आहेत. सारे काही नियोजनानुसार घडले तर पुढील वर्षी लस उपलब्ध होईल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
- तांत्रिक पारिभाषिक नाव ः ChAdOx१ nCoV-१९
- चिंपांझी माकडांना होणाऱ्या सामान्य सर्दीस कारणीभूत ठरणारा विषाणू अनुवांशिकरित्या अभियांत्रिकी पद्धतीने तयार करून त्याचा लसीसाठी वापर
- मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आल्यामुळे संसर्ग होत नाही
- विषाणू बराचसा कोरोनासारखा दिसत असल्याने प्रतिकारशक्ती निर्मिती यंत्रणा त्यावर हल्ला करण्यास शिकते
- कोरोना विषाणूसंदर्भात सगळा प्रकाशझोत प्रतिपिंडांवरच
- मात्र हा प्रतिकार क्षमतेचा केवळ एक भाग
- प्रतिकारशक्तीची यंत्रणा छोट्या प्रथिनांच्या रूपाने प्रतीपिंड तयार करते
- ही प्रतिपिंड विषाणूच्या पृष्ठभागावर चिकटतात
- प्रतिपिंडांचा प्रभाव कमी केल्यास विषाणू निकामी होतो
- टी-पेशी या पांढऱ्या रक्त पेशीचा प्रकार
- प्रतिकारशक्ती यंत्रणेच्या समन्वयाचे काम
- शरीराच्या कोणत्या पेशींना संसर्ग झाला हे हेरून त्या निकामी करण्याची क्षमता
- जवळपास सर्व परिणामकारक लसींमध्ये प्रतीपिंड आणि टी-पेशी प्रतिसाद यंत्रणेचा वापर
- होय, काही दुष्परिणाम संभवतात
- दुष्परिणाम अजिबात गंभीर नाहीत
- ७० टक्के लोकांना ताप किंवा डोकेदुखी
- पॅरासिटेमॉलच्या उपचाराने त्यावर नियंत्रण शक्य
- लोकांना देण्याइतपत लस सुरक्षित असल्याचे मुख्य उद्दिष्ट साध्य करणे
- लस लोकांच्या आजाराला प्रतिबंध करते का? किंवा कोरोना लक्षणे तरी कमी करते का? हे अभ्यासातून स्पष्ट नाही
- ब्रिटनमधील संसर्गाची तीव्रता कमी झाल्यामुळे इतर देशांत चाचणीची व्याप्ती
- अमेरिकेत २० हजार लोकांवर चाचणी होणार
- दक्षिण आफ्रिकेत २०००, तर ब्राझीलमध्ये पाच हजार जणांना लस टोचली जाणार
- आव्हान चाचणी (चॅलेंजर ट्रायल्स) होणार, यात कोरोना विषाणूचा मुद्दाम संसर्ग घडवून लस टोचली जाणार
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.