ब्रिटनच्या पंतप्रधान (Britain Politics) लिझ ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान (Prime Minister resignation) झाल्यानंतर केवळ ४४ दिवसांनी त्यांनी हे पद सोडले. ब्रिटन सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या काळातून जात आहे. लिझ ट्रस यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात गेले होते. यानंतर वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, नवीन पंतप्रधान होईपर्यंत त्या पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळतील.
(Britain Politics Latest Updates)
ट्रस या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करून त्या पंतप्रधान झाल्या होत्या. पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढे होते. मात्र, नंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.
ऋषी सुनक यांना पंतप्रधान करण्याची मागणी कंझर्व्हेटिव्ह पक्षात जोर धरू लागली आहे. ब्रिटीश खासदारांचा आरोप आहे की ट्रसच्या समर्थकांनी संसदेत गॅस ड्रिलिंगच्या विरोधात मतदान करण्याचा कट रचला होता. दरम्यान कंझर्व्हेटिव्ह खासदारांमध्ये ट्रसविरोधात रोष होता. अशा परिस्थितीत खासदारांच्या मतदानानेच ऋषी सुनक यांना पंतप्रधानपद मिळू शकते. अशी चर्चा आहे.
लिट ट्रस राजीनामा का दिला?
लिट ट्रस यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोध होऊ लागला होता. एक दिवस आधी, गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी कॅबिनेटमध्यून राजीनामा दिला. ट्रस यांनी सांगितले की त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत आणि पक्षाचा विश्वास गमावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.