rishi sunak wins second round of voting in UK leadership contest  
ग्लोबल

युके पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर; दुसऱ्या फेरीतही विजयी

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी दुसऱ्या फेरीत बाजी मारली आहे. त्यांना सर्वाधिक 101 खासदारांनी मतदान केले .या विजयासह सुनक यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. दुसरीकडे, अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन सर्वात कमी 27 मतांसह पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहीलेले ऋषी सुनक हे यूकेच्या नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांसाठी दुसऱ्या फेरीत झालेल्या मतदानातही त्यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना सर्वाधिक 101 खासदारांनी मतदान केले. त्यांच्या खालोखाल पेनी मॉडर्ट 83 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांना सर्वात कमी 27 मते मिळाली, ती पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत., कंझर्व्हेटिव्ह खासदारांमधील मतदानाची दुसरी फेरी सकाळी 11.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू झाली. खासदारांना मतदानासाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुदत होती.

दरम्यान बुधवारीही पहिल्या फेरीत ऋषी सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना 88 मते मिळाली होती. मतदानाच्या पहिल्या फेरीत माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांना सर्वात कमी 30 मते मिळाली आणि तेही शर्यतीतून बाहेर पडले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 6 उमेदवार बाकी आहेत. मतदानाच्या प्रत्येक फेरीत, सर्वात कमी मतांचा एक उमेदवार शर्यतीतून बाहेर जाईल आणि अखेरीस दोन उमेदवार शिल्लक राहतील. त्यातूनच देशाचा नवा पंतप्रधान निवडला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT