PNG Jewellers robbery in america sakal
ग्लोबल

PNG Jewellers : अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा; दुकानाची तोडफोड करत दागिने पळविले

अमेरिकेतील सनीव्हॅले येथे पुण्याच्या पीएनजी ज्वेलर्सची शाखा असलेल्या सराफ दुकानावर दरोडा.

वृत्तसंस्था

सनीव्हॅले (कॅलिफोर्निया) - अमेरिकेतील सनीव्हॅले येथे पुण्याच्या पीएनजी ज्वेलर्सची शाखा असलेल्या सराफ दुकानावर दरोडा पडला असून सुमारे वीस बुरखाधारी दरोडेखोरांनी दुकानाची तोडफोड करत सोने, चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले. हा दरोडा १२ जून रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १.२० च्या सुमारास पडला. गेल्या सहा आठवड्यात बे एरियात भारतीय ज्वेलर्सवर दरोडा पडण्याची तिसरी वेळ आहे.

भारतीयांच्या मालकीचे पीएनजी ज्वेलर्सचे अल कॅमिनो रिअल येथे दुकान असून १२ जून रोजी दिवसाढवळ्या २० हून अधिक दरोडेखोरांनी हल्ला करत लुटमार केली आणि अनेक मोटारीतून पोबारा केला. ते दुपारी १.३० च्या सुमारास दुकानात शिरले आणि हातोड्याचा वापर करत शोकेसच्या काचा फोडल्या. दुकानातील सर्व दागिने लुटले.

या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यामुळे पाच जणांना पकडण्यात यश आले. गेल्या सहा आठवड्यात बे एरियातील भारतीयांच्या दागिन्यांच्या दुकानांवर दरोडा पडण्याची तिसरी वेळ आहे. सनीव्हॅले डिपार्टमेंट ऑफ पोलीस सेफ्टीने जारी केलेल्या निवेदनात, पोलिसांना १.३० वाजता कॉल आला आणि तत्काळ प्रतिसाद देत पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

तोपर्यंत दरोडेखोर अनेक वाहनांतून पळून गेले होते. या दरोड्यात कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना सूचना दिल्याने सॅन फ्रान्सिस्को किनारपट्टीच्या दिशेने जाणाऱ्या दोन संशयित गाड्यांचा पाठलाग केला. या दोन्ही गाड्या अत्यंत वेगाने असल्याने त्या काही वेळातच दृष्टीआड गेल्या. मात्र पोलिसांच्या सहयोगी यंत्रणांनी रेडवुड सिटीजवळ एका गाडीचा शोध लावला.

तेथे पाच दरोडेखोर गाडी सोडून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. पाचही दरोडेखोरांची ओळख पटली असून टोंगा लातू, तावाके इसाफे, ओफा अहोमाना, किल्फी लिआटोआ आणि अफुहिया लावाकिहओ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना विविध गुन्ह्याखाली साता क्लारा कौंटी तुरुंगात ठेवले आहे. त्यांच्यावर दरोडा आणि वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

बे एरियातील तिसरी घटना

पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा पडण्यापूर्वी सनीव्हॅले येथे चार मे रोजी नितीन ज्वेलर्स आणि २९ मे रोजी नेवार्क येथील भिंडी ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. तिन्ही दरोड्यात आरोपींनी एकाच प्रकारे दरोडा टाकल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या तिन्ही दरोड्यांचा एकमेकांशी संबंध आहे की नाही, याचा तपास लावला जात असल्याचे कॅप्टन डझान ले यांनी सांगितले. सर्व घटनांत एकच टोळी असेल तर तसे आम्ही घोषित करू, परंतु सध्या आमच्याकडे कोणत्याही प्रकारची ठोस माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT