Flesh-Eating Bacteria Esakal
ग्लोबल

Flesh-Eating Bacteria: 'मांस खाणाऱ्या' बॅक्टेरियाबाबत देशात उलट-सुलट चर्चा; जपानमधील भारतीयांची प्रसार माध्यमांना विनंती

Indians In Japan: जपानमध्ये सुमारे ५०००० भारतीय राहतात. तशी ही जपानमधील भारतीयांची पहिलीच पिढी आहे.

आशुतोष मसगौंडे

अलीकडे भारतातील प्रसारमाध्यमे जपानमधील 'मांस खाणाऱ्या' बॅक्टेरिया बाबतच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत, छापत आहेत.

या बॅक्टेरियामुळे जपान आणि संपूर्ण जग धोक्यात आले आहे, कोरोनापेक्षा भयानक परिस्थीतीला सामोरे जावं लागणार, जगाला दुसऱ्या एका महामारीला तोंड द्यावे लागणार असे अनेक मोठे-मोठे दावे यातून केले जात आहेत.

हा बॅक्टेरिया आणि त्याची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे गंभीर आहेत. पण, ज्या पद्धतीने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले जात आहे ते चुकीचे आहे असे जपानमधील भारतीयांचे मत आहे.

या आजारामुळे मृत्यूचा धोका किती?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, 'या आजाराची लागण झाल्यानंतर ४८ तासात त्या व्यक्तीचा मृत्यू होतोच होतो' हे सांगण्यावर प्रसारमाध्यमे भर देत आहेत. पण परिस्थिती थोडी वेगळी आहे.

गेल्या वर्षी जपानमध्ये एकूण ९४१ लोकांना या आजाराची लागण झाली त्यापैकी सुमारे ९७ लोकांचा मृत्यू झाला तर यावर्षी आतापर्यंत ९७७ लोकांना लागण झाली असून ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सर्वसाधारणपणे, या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो परंतु मुले, वयस्क आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.

स्वच्छता अन् जपानी नागरिक

जपानसाठी नैसर्गिक संकटे नवीन नाहीत. वेळोवेळी होणारे भूकंप, वादळी वारे यांना इथले लोक नेहमी तोंड देत असतात आणि कदाचित त्यामुळेच इतर नवीन कुठल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ते वेळेआधी तयार असतात.

टोकियो शहरालगत योकोहामा, साईतामा, चिबा, सागामिहारा ही चिकटून असलेली शहरे आहेत (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण ही शहरे आहेत त्याप्रमाणे). टोकियो आणि या शहरांची एकत्र लोकसंख्या सुमारे ३ कोटी ७० लाख आहे. एवढी दाट लोकसंख्या असूनसुद्धा जेव्हा संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा इथे आणि जपानच्या इतर भागात ट्रेन, शाळा, कार्यालये, मॉल, दुकाने कधीच बंद केली नव्हती.

लॉकडाऊन हा प्रकारच जपानमध्ये लागू केला नव्हता. हे सगळं शक्य झाले होते इथल्या नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या सवयीमुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे, वेळोवेळी सरकारने घालून दिलेले नियम कटाक्षाने पाळल्यामुळे आणि सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे!

अशीच परिस्थिती या नवीन बॅक्टेरियाबद्धल आहे. इथे सर्वजण शक्य तेवढी काळजी घेत आहेत. आजाराची लक्षणे असल्यास दवाखान्यात जाणे, मास्क वापरणे, अंगावर जखमा असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेणे अशा सूचनांचे सर्वजण पालन करत आहेत.

जपानमधील भारतीयांची विनंती

इथले सरकार, यंत्रणा जापानी नागरिकांबरोबर इथे राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांची सुद्धा तेवढीच काळजी करतात. शिवाय जपानमधील भारतीय दूतावास सुद्धा इथल्या भारतीयांना वेळोवेळी मदत करण्यासाठी उपलब्ध असते.

जपानमध्ये सुमारे ५०००० भारतीय राहतात. तशी ही जपानमधील भारतीयांची पहिलीच पिढी आहे. अशा बातम्या ऐकून, पाहून भारतात राहत असलेले नातेवाईक खूप घाबरतात आणि विनाकारण मानसिक तणावाखाली येतात.

भारतातील प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या जबाबदारीने प्रसारित कराव्या आणि सोबत जपान सरकार, इथले नागरिक अशा संकटाना तोंड देण्यास कसे सक्षम आहे हेसुद्धा सांगावे जेणेकरून भारतात राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, अशी विनंती जपानमधील भारतीयांकडून प्रसारमाध्यमांना केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT