vladimir putin Sakal
ग्लोबल

रशियाची मोठी खेळी: 'रुबल' ला दिलं बळ

रशिया-बेलारुसचं चलन (currency) आणि मोबाईल नेटवर्क एकच असणार

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि अमेरिकेचे डेप्युटी NSA दलिप सिंह भारताच्या दौऱ्यावर आहेत. दलिप सिंह हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वाचं स्थान आहे. रशिया- युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे भारताला आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न रशिया आणि अमेरिका करताना दिसत आहे.

अशातच रशियाने आपला शेजारील राष्ट्र बेलारुसच चलनदेखील 'रुबल' असेल तसेच त्याचं मोबाईल नेटवर्क देखील सारखंच असेल अशी बातमी रशियाच्या वृत्तपत्रांनी दिलंय. बेलारुस हे रशियाचं जवळील राष्ट्र असून त्याचा फायदा रशिया घेताना दिसतयं. रशियाची राजधानी ते बेलारुस देशाचं हवाई अंतर ६६२ कीलोमीटर असून, रस्त्याने हेच अंतर ७२० कीलोमीटर आहे. रशियाला बेलारुसवरुन युक्रेनवर हल्ला करणं आणि युक्रेनवर लक्ष ठेवणं सोपं पडत असल्याने, याच रणनितीचा भाग म्हणजे रशिया आणि बेलारुस यांनी एकच चलन आणि मोबाईल नेटवर्क ठेवल्याचं म्हंटलं जातयं.

जगाने रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले गेल्याने रुबल चलनाची किंमत घसरली आहे. मात्र रशियाकडून नैसर्गिक गॅस खरेदीसाठी आता रुबलमध्येच व्यवहार केला जाईल अशी घोषणा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केली होती. यामुळे रुबल चलनाला बळ मिळाले होते. रशियाच्या चलनाची घसरणारी किंमत रशियासाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT