Russia earthquake viral video Esakal
ग्लोबल

Russia Earthquake: रशियात महाभयंकर भूकंप! ज्वालामुखीचा उद्रेक, थरकाप उडवणारे Video Viral

Russia Earthquake: द्वीपकल्प भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशात आहे ज्याला प्रशांत महासागराचा बराच भाग वेढला आहे, याला "रिंग ऑफ फायर" म्हणूनही ओळखले जाते.

आशुतोष मसगौंडे

रविवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाचा किनारा होता. त्याचवेळी, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा दिला आहे. (Russia Earthquake).

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियामध्ये भूकंप सकाळी 7 वाजल्यानंतर आला. पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराच्या पूर्वेला सुमारे 90 किलोमीटर अंतरावर कामचटका द्वीपकल्पातील पाण्यात सुमारे 50 किलोमीटर (30 मैल) खोलीवर त्याचा केंद्रबिंदू होता.

रशियाच्या युनिफाइड जिओफिजिकल सर्व्हिसच्या शाखेने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले की, सुरुवातीच्या भूकंपानंतर अनेक धक्के नोंदवले गेले, परंतु त्यांची तीव्रता कमी होती.

द्वीपकल्प भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशात आहे ज्याला प्रशांत महासागराचा बराच भाग वेढला आहे, याला "रिंग ऑफ फायर" म्हणूनही ओळखले जाते. तेथे 24 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत.

दरम्यान या भूकंपानंतर रशियात काय आणि किती जीवितहानी झाली आहे, याबाबतची आकडेवारी अद्याप समोर आली नाही.

शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक

सरकारी मालकीच्या TASS वृत्तसंस्थेने रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या सुदूर पूर्व शाखेच्या ज्वालामुखी आणि भूकंपविज्ञान संस्थेचा हवाला देऊन म्हटले आहे की, ज्वालामुखीने राख आणि लावा सोडण्यास सुरुवात केली होती.

अहवालात शास्त्रज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला आहे, व्हिज्युअल मूल्यांकनानुसार राखेचा प्लम समुद्रसपाटीपासून आठ किलोमीटर उंच होत आहे.

याआधी अमेरिकेच्या नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने भूकंपामुळे सुनामीचा धोका असल्याचे म्हटले होते. परंतु रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या कामचटका शाखेने सुनामीचा धोका नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

SCROLL FOR NEXT