Russia Crude Oil Sakal
ग्लोबल

Crude Oil :रशियाने वाढवल्या तेलाच्या किमती , स्वस्त तेलासाठी मोदी सरकार या देशाशी करणार हातमिळवणी

Russian Crude Oil: xरशियाने वाढवल्या तेलाच्या किमती, भारताने घेतला महत्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Crude Oil market:भारताने मागच्यावर्षी जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली होती, तेव्हा तेलावर मोठ्या प्रमाणात सुट मिळतं होती. बघता बघता रशिया भारताचा तेलाचा पुरवठा करणारा महत्वाचा देश बनला.

मात्र, आता भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यात रस राहिलेला नाही, कारण त्या तेलावर मिळाणारी सुट रशियाकडून कमी करण्यात आली आहे.भारत आता तेल आयात करण्यासाठी आपल्या पारंपारिक तेल निर्यात करणाऱ्या देशांशी चर्चा करायला सुरुवात केली.

रशियन तेलामध्ये मिळणारी कमी सुट आणि पेमेंट करताना येणाऱ्या अडचणींमुळे भारत सरकारने आपल्या पारंपारिक निर्यात करणाऱ्या देशांकडे तोंड फिरवलं आहे. सरकारी रिफायनर इराकमधून तेलाची आयात वाढवण्यासाठी चर्चा करत आहेत.

माध्यमांना ही माहिती वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की रशियाने तेलाच्या किमतीमध्ये वाढ केली जात आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये रशियन तेल ६० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त किमतीने विकलं जातंय.

अधिकाऱ्याने नावाची गोपनीयता ठेवण्याच्या अटीवर सांगितले की आठवड्याभरात रशियन तेलावर मिळणाऱ्या सुटीमध्ये घट झालीये. जर रशियन सरकार प्राईस कॅपपेक्षा जास्त किमतीमध्ये तेल विकत असतील, तर रशियाकडून तेल विकत नाही घेतलं पाहिजे.

अधिकाऱ्याने सांगितलं की भारताने इराक सरकारला सांगितलंय की तेलाची रक्कमेबद्दल काही नियमांमध्ये बदल करण्यावर विचार करावा.

जसं की भारताचे सरकारी रिफायनर्स इंडियन ऑईल कॉरपोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन (HPCL) इराककडून जास्त प्रमाणात खरेदी करतील, ज्याच्य बदल्यात तेलाचा सध्याचा क्रेडिट काळ ६० दिवसांनी वाढवून ९० दिवसं करावा.

रशिया-युक्रेन युद्धाच्या आधी इराक होता भारताचा निर्यातक देश

रशिया युक्रेन युद्धाच्या आधी, इराक भारताचा सर्वात मोठा तेल निर्यातक देश होता.भारत रशियाकडून अत्यंत कमी प्रमाणात तेल खरेदी करायचा. मात्र, युक्रेनवर केलेल्या आक्रमणापासून तर मागच्या १५ महिन्यांपर्यंत रशिया भारताचा सर्वात मोठा तेल निर्यातक देश म्हणून उदयास आला.

पाश्चिमात्य देशांनी रशियावर लावलेल्या प्रतिबंधामुळे रशियाने आपल्या तेलावर मोठ्या प्रमाणात सुट दिली. ज्यामुळे भारताने मोठ्या प्रमाणावर रशियन तेल खरेदी केले. सध्या भारताच्या आयातीमध्ये ४० टक्के तेल रशियाकडून येतंय.

रशियन युरालच्या किंमती प्राईसकॅपपेक्षा जास्त

डिसेंबरच्या सुरुवातीला रशियन तेलावर प्राईस कॅप लावल्यापासून रशियन युराल क्रूड ऑईलची किंमत पहिल्यांदा ६० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेली आहे. भारताच्या रशियन तेल आयातीमध्ये युरालचा वाटा दोन तृतीयांश इतका आहे.(Latest marathi News)

युरालच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे मुख्य तेल निर्यात करणाऱ्या देशांनीही तेलाच्या उत्पादनात घट केली आहे. ज्यानंतर तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली.

अधिकाऱ्याने सांगितलं की आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी ६० डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक किमतीचा एकही कोर्गो खरेदी केला नाही आणि यापुढेही करणार नाही.

प्राईस कॅपनुसार, जर रशियन तेल ६० डॉलर प्रति बॅरल पेक्षा जास्त किमतीवर खरेदी केलं गेलं तर रशियन तेलाच्या डिलिव्हरीवर पाश्चिमात्य जहाज आणि पाश्चिमात्य विमा सेवांवर बंदी लावली जाते.(Latest marathi News)

जर रशियला युरोमध्ये पेमेंट केलं तर पेमेंट अडकू शकतं.कारण तेल व्यापारामध्ये रशियाला युरो किंवा डॉलर वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे भारताचे रिफायनर आणि बॅंका अशा पद्धतीच्या व्यवहारापासून लांब राहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT