भारताला (India) आतापर्यंत स्पुटनिकचे (Sputnik) दीड लाख डोस आणि त्यानंतर आणखी 60 हजार अतिरिक्त डोस पुरवण्यात आले आहेत.
मॉस्को - भारताला (India) आतापर्यंत स्पुटनिकचे (Sputnik) दीड लाख डोस आणि त्यानंतर आणखी 60 हजार अतिरिक्त डोस पुरवण्यात आले आहेत. तसंच मे अखेरपर्यंत 30 लाख डोस पुरवण्यात येतील. तर ऑगस्टमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन 50 लाख इतका पुरवठा होण्याची अपेक्षा असल्याचं रशियाच्या (Russia) सेंट पिटर्सबर्गमधील भारतीय राजदूतांनी म्हटलं आहे. भारतात 850 दशलक्ष स्टुटनिक लशीचे डोस तयार करण्याची योजना आहे. जगभरात तयार होणाऱ्या स्पुटनिक लशीचं 65 ते 70 टक्के उत्पादन हे भारतातच होईल असंही राजदूत डी बाला व्यंकटेश वर्मा यांनी सांगितलं. (Russia-may-supply-30-lakh-dose-of-sputnik-v-to-india-by-may-end-says-indian-envoy)
स्पुटनिक लशीचे उत्पादन भारतात तीन टप्प्यात होईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात रशियातून पूर्ण पणे तयार लस आयात केली जाणार आहे. ही प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात RDIF मोठ्या प्रमाणात भारतात पाठवण्यात येईल. ते वापरण्यासाठी तयार असेल मात्र ते लशीच्या बॉटल्समध्ये भरावं लागेल. तिसऱ्या टप्प्यात रशिया त्यांचे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांनी देईल. त्यानंतर भारतीय कंपनी स्पुटनिकचे उत्पादन भारतात करेल. असे मिळून 3 टप्प्यात 850 मिलियन डोस तयार होतील असं व्यंकटेश शर्मा म्हणाले.
रशियाने स्पुटनिक लाइटचासुद्धा प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप भारताकडून मान्यता मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती मान्यता मिळाली की स्पुटनिक लाइटमध्ये भारत आणि रशिया यांच्यात आणखी एक भागिदारी होईल असंही भारताच्या राजदूतांनी सांगितले.
रशियाकडून भारताला एस 400 मिसाइल देण्यात येणार आहे. याबाबत 2021 च्या शेवटच्या तिमाहीत कराराची पुढची प्रक्रिया होईल. आमच्याकडे रशियात एक टीम आहे जी या सर्व प्रक्रियेचं प्रशिक्षण आणि इतर व्यवस्थेचा भाग आहे. त्यांचे रशियात आधीपासूनच प्रशिक्षण सुरु असल्याची माहितीही रशियाच्या राजदूतांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.