याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारत, जपान आणि जर्मनीला UNSC चे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी रशियानं (Russia) भारताला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Russian Foreign Minister Sergei Lavrov) यांनी म्हटलं की, सुरक्षा परिषद अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी लोकशाही मजबूत होणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत (India) आणि ब्राझीलला सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असं त्यांनी स्पष्ट करत पाठिंबा दिला.
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी भारत, जपान आणि जर्मनीला UNSC चे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. मात्र, या दिशेनं अजून बरंच काम होणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतासह इतर 31 देशांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी आणि स्थायी सदस्यांच्या श्रेणी आणखी वाढवल्या पाहिजेत. सुरक्षा परिषदेच्या कामकाजात अजून सुधारणांची गरज असल्याचं भारतानं म्हटलं.
भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या सत्राला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादासह शेजारी राष्ट्र चीन आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जयशंकर म्हणाले, 'मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातून 130 कोटी लोकांच्या शुभेच्छा घेऊन इथं आलोय. भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. त्याला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणत आहोत. या युगाची कहाणी कोट्यवधी भारतीयांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि उपक्रमाची आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.