सैनिकेश Sakal
ग्लोबल

युक्रेनकडून युद्धाची तयारी; तमिळनाडूतील सैनिकेशने उचलली बंदूक

काही दिवसांपूर्वी त्याने अमेरिकी लष्करामध्ये भरती होण्यासाठी त्यांच्या दूतावासासोबत संपर्क साधला होता पण तिथेही त्याच्या पदरात नकार पडला.

सकाळ वृत्तसेवा

कोइमतूर : भारतामध्ये राहून लष्करात सहभागी व्हायचे स्वप्न भंगलेल्या येथील एका २१ वर्षीय तरुणाने आता युक्रेनच्या बाजूने युद्धात उडी घेतली आहे. तमिळनाडूतील या विद्यार्थ्याचे नाव सैनिकेश रविंचंद्रन असे आहे. मध्यंतरी केंद्रीय तपास यंत्रणांचे काही अधिकारी हे त्याच्या थुडीयालूर येथील घरी काही कागदपत्रे गोळा करण्यासाठी गेले असता ही धक्कादायक बाब उघड झाली. भारतीय लष्करामध्ये भरती व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या सैनिकेशची लष्करी सेवेची संधी दोन वेळा उंचीअभावी हुकली होती. काही दिवसांपूर्वी त्याने अमेरिकी लष्करामध्ये भरती होण्यासाठी त्यांच्या दूतावासासोबत संपर्क साधला होता पण तिथेही त्याच्या पदरात नकार पडला. सैनिकेश हा युक्रेनमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला व्हिडिओ गेमची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती, पण अचानक युद्ध सुरू झाल्याने सगळे काही पुन्हा विस्कळित झाल्याचे त्याच्या पालकांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. सैनिकेशला तातडीने मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी विनंती त्याच्या आई -वडिलांनी भारत सरकारकडे केली आहे.

जॉर्जियन नॅशनल लिजन

सैनिकेश हा खारकिव्हमधील नॅशनल एअरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये २०१८ पासून एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे धडे गिरवतो आहे. सध्या तो हा युक्रेनच्या जॉर्जियन नॅशनल लिजनमध्ये सहभागी झाला असून हे निमलष्करी दलाचे एक पथक असून ते रशियाविरोधात लढते आहे. देश -परदेशातील अनेक स्वयंसेवक हे युक्रेनच्या लढ्यामध्ये उत्स्फूर्तपणे उतरले असून त्यात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि अगदी भारतामधील काही युक्रेनी नागरिकांचा समावेश आहे.

सैनिकेशबाबतचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला आहे, माझ्या दुःखाला पारावार राहिलेला नाही. ही बातमी समजल्यापासून आम्हाला अनेकांचे फोन येत आहेत. मी माझा फक्त मुलगा कधी घरी परततो याची वाट पाहते आहे.

- लक्ष्मी, सैनिकेशची आई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT