Russia Ukraine War: गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, शेकडो रशियन सैनिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) जगातील कोणत्याही नेत्याचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे युक्रेनमध्ये रक्तरंजित खेळ सुरूच आहे. दरम्यान, रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेबरोबरच युरोपीय देश रशियावर आर्थिक निर्बंध (Economical Sanctions) लादत आहेत. गेल्या 8 वर्षांत उत्तर कोरियापेक्षा (North Korea) रशियावर अधिक निर्बंध लादण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
सीरिया यांच्यावर जेवढे निर्बंध लादले गेले त्यापेक्षा जास्त निर्बंध गेल्या आठ वर्षात रशियावर लादले गेले आहेत. त्यामुळे बंदी उठवण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे. उदाहरणार्थ, क्युबावरील निर्बंध उठवायला अनेक दशके लागली.
रशिया दिवाळखोर होईल?-
रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाचा जीडीपी २% ने घसरला आहे. नुकत्याच झालेल्या निर्बंधानंतर रशियन अर्थव्यवस्थेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे असंच जर सुरु राहिलं तर या वर्षी मे महिन्यापर्यंत रशिया दिवाळखोरीत निघू शकतो, असा दावा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था करत आहेत. 24 फेब्रुवारी रोजी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याची घोषणा केली. रशियन सैन्याने एकाच वेळी उत्तर, पूर्व आणि क्रिमियामध्ये हल्ले केले.
अमेरिकेकडून निर्बंध कडक-
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले की अमेरिका रशियाचा व्यापार कमी करेल. तसेच रशियन वाईन, सीफूड आणि हिरे यांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संतापलेल्या अमेरिका आणि युरोपीय संघाशिवाय जी-7 गटही रशियाकडून 'मोस्ट फेव्हर्ड कंट्री' (एमएफएन) दर्जा काढून घेऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन लवकरच या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. मोस्ट फेव्हर्ड कंट्रीचा (Most Favoured Country) दर्जा काढून घेतल्याने अमेरिका आणि त्यांचे मित्र देश रशियाकडून होणाऱ्या आयातीवर जास्त कर लावू शकतील. या निर्णयामुळे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना रशियाची अर्थव्यवस्था एकाकी पाडायची आहे.
ड्यूमाच्या 386 सदस्यांवर बंदी -
यूके सरकारने रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह ड्यूमाच्या 386 सदस्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. युक्रेनच्या लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रांतांना रशियाने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात ड्युमाच्या या सर्व सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटनच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) ने शुक्रवारी निर्बंध जाहीर केले आणि म्हटले की ते रशियन खासदारांना ब्रिटनमध्ये प्रवास करण्यास, त्यांची मालमत्ता वापरण्यास आणि ब्रिटनमध्ये व्यवसाय करण्यास प्रतिबंध असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.