Russian commander Lieutenant General Yakov Rezantsev esakal
ग्लोबल

युक्रेनच्या हल्ल्यात 'युद्ध काही तासांत संपेल' म्हणणारा रशियन कमांडर ठार

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनच्या विविध भागांवर रशियानं केलेल्या भीषण हल्ल्यांमुळं मोठं नुकसान होत आहे.

रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा 31 वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. युक्रेनच्या विविध भागांवर रशियानं केलेल्या भीषण हल्ल्यांमुळं मोठं नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाहीय.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन युद्धात आपला सातवा सेनापती गमावलाय. 48 वर्षीय रशियन कमांडर लेफ्टनंट जनरल याकोव्ह रेझान्त्सेव्ह (Russian commander Lieutenant General Yakov Rezantsev) युक्रेनच्या सशस्त्र दलांनी (Ukrainian Army) केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या चौथ्या दिवशी रेझान्त्सेव्ह यांनी सांगितलं होतं की, हे युध्द फार काळ टिकणार नाहीय, ते काही तासांतच संपेल, असं त्यांनी नमूद केलं होतं. रेझान्त्सेव्ह हे दक्षिणी लष्कराच्या 49 व्या संयुक्त शस्त्रास्त्र दलाचे कमांडर होते.

पुतिन यांनी 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून आतापर्यंत सहा जनरल रशियानं गमावल्याचा दावा पाश्चात्य अधिकाऱ्यांनी केलाय. एका लेफ्टनंट कर्नलला देखील युक्रेनमध्ये पकडण्यात आलं होतं. आतापर्यंत आम्ही सात रशियन कमांडरना मारल्याचा दावाही युक्रेननं केलाय. मॉस्कोच्या संरक्षण मंत्रालयानं (Moscow’s Defence Ministry) सांगितलं की, या युध्दात आतापर्यंत 1,351 रशियन सैनिक मरण पावले आहेत. IFAX नं शुक्रवारी हा अहवाल दिलाय. झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी सांगितलं की, रशियन सैन्यानं हजारो सैनिक गमावले आहेत. परंतु, तरीही ते कीव किंवा खार्किव्ह ताब्यात घेऊ शकलं नाही, असं त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT