रशियाने युक्रेवर हल्ला केल्यानंतर सर्वांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली. अनेकांनी रशियाने हल्ला करायला नको होता, असे म्हटले. तसेच रशियाला त्यांच्याच देशातील नागरिकांच्या विरोधाचाही सामना करावा लागला. आता रशियाच्या पत्रकाराने युक्रेनियन निर्वासितांसाठी पैसे उभे करण्यासाठी नोबेल पदकाचा लिलाव करणार असल्याचे सांगितले. दिमित्री मुराटोव्ह असे त्या पत्रकाराचे नाव आहे.
रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह हे मागच्या वर्षीचे नोबेल शांतता पुरस्काराचे सह-विजेते होते. ते नोवाया गॅझेटा वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. रशियाच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटरने मार्चच्या सुरुवातीला दहा स्थानिक मीडिया आउटलेटला चेतावणी दिली. या संस्थांवर रशियाच्या लष्करी मोहिमेचे चुकीचे वर्णन केल्याचा आरोप होता. ज्या संस्थांना नोटिसा पाठवल्या त्यात रेडिओ स्टेशन इको मॉस्कवी आणि नोवाया गॅझेटा हे वृत्तपत्र आहेत.
मुराटोव्ह यांनी वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या लेखात म्हटले आहे की, नोव्हाया गझेटा आणि मी यांनी २०२१ साठीचे नोबेल शांतता पारितोषिक पदक युक्रेनच्या (ukraine) निर्वासित निधीला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच दहा दशलक्षाहून अधिक निर्वासित आहेत. मी लिलावगृहांना प्रतिसाद देण्यास सांगतो आणि जगप्रसिद्ध पुरस्काराचा लिलाव करण्यास सांगतो.
पाच गोष्टी त्वरित करणे आवश्यक आहे. युद्ध थांबवा, कैद्यांची अदलाबदल करा, मृतदेह परत द्या, मानवतावादी कॉरिडॉर व मदत द्या आणि निर्वासितांना पाठिंबा द्या, असे क्रेमलिनवर टीका करणारे वृत्तपत्र मुराटोव्ह आणि नोवाया गझेटा म्हणाले. फिलीपिन्सच्या मारिया रासा, न्यूज साइट रॅपरच्या सह-संस्थापकासह संयुक्तपणे पारितोषिक जिंकणारे मुराटोव्ह यांनी गेल्या वर्षीचा नोबेल पुरस्कार मारल्या गेलेल्या सहा वृत्तपत्र पत्रकारांना (Journalist) समर्पित केला होता.
युक्रेनच्या सैन्याने जोरदार प्रतिकार केला
रशियाने (russia) २४ फेब्रुवारीला हजारो सैन्य युक्रेनमध्ये पाठवले. रशियाने याला त्याच्या दक्षिण शेजारी युक्रेनच्या (ukraine) लष्करी क्षमतेला कमजोर करण्यासाठी आणि त्याला धोकादायक राष्ट्रवादी म्हणून संबोधण्यासाठी विशेष ऑपरेशन म्हटले. आतापर्यंत युक्रेनच्या सैन्याने जोरदार प्रतिकार केला आहे. रशियाला माघार घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नात पश्चिमेने रशियावर व्यापक निर्बंध लादले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.