Russian millionaire offers crores prize for putin's arrest  टिम ई सकाळ
ग्लोबल

पुतीन यांना अटक करणाऱ्याला मिळणार कोटींचे बक्षीस; रशियन उद्योगपतीची पोस्ट व्हायरल

अ‍ॅलेक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरुद्ध युध्द पुकारले आणि त्याचा परीणाम आज संपुर्ण जगावर पडला. अमेरिका सारख्या बलाढय आणि शक्तिशाली देशाकडून वारंवार चेतावणी देऊन सुद्धा पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला. आक्रमकवृत्ती असणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्यावर रशियन उद्योगपतीने बक्षीस जाहीर केले आहे. जो कोणी पुतीन यांना अटक करेल त्याला साडेसात कोटींचे बक्षीस मिळणार असल्याचे या उद्योगपतीने म्हटले आहे. अ‍ॅलेक्स कोनानिखिन (Alex Konanykhin) असे या व्यक्तीचे नाव आहे. (Russian Millionaire offers crores prize for putin's arrest)

अ‍ॅलेक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अ‍ॅलेक्स कोनानीखिन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्लादिमीर पुतिन यांचा फोटोही आहे, ज्यामध्ये ‘मृत किंवा जिवंत’ असे लिहिले आहे. या पोस्टमध्ये अ‍ॅलेक्स म्हणतो, “ मी वचन देतो की जो कोणी आपले घटनात्मक कर्तव्य बजावेल आणि पुतीनला रशियन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धाचा गुन्हेगार म्हणून अटक करेल, त्याला मी साडेसात कोटी देणार'.

अ‍ॅलेक्स म्हणतो “पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत. त्यांनी विशेष ऑपरेशनचा भाग म्हणून रशियामधील अनेक अपार्टमेंट्स, इमारती उडवून दिल्या. रशियाचा नागरिक या नात्याने, नाझीवादाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी रशियाला मदत करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. या रशिया आणि युक्रेन युद्धात पुतीन विरोधात आपली बाजू मांडणाऱ्या युक्रेनला मदत करत राहणार”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT