रशिया : देशात कोरोनाचा संसर्ग (coronavirus) रोखण्यासाठी, 28 ऑक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रशियात सध्या कोरोना विषाणूचा (corona virus) झपाट्याने प्रसार होतोय. याच पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (russian president putin) यांनी नॉन वर्किंग (weekly lockdown) विकची घोषणा केली आहे. पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे. शियामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड -19 मुळे 1,028 लोकांचा मृत्यू झाला. महामारीच्या प्रारंभापासून एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे.
नॉनवर्किंग विक जाहीर, कामगारांना भरपगारी रजा
या दरम्यान सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच लोकांनाही घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी, 28 ऑक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे की सर्व दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद असतील. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापौर सोब्यानिन म्हणाले की केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल.
मृतांचा आकडा वाढतोय
पुतिन यांनी बुधवारी सांगितले की, ते 30 ऑक्टोबर रोजी नॉन वर्किंग विक सुरू करण्याच्या आणि पुढील आठवड्यापर्यंत वाढविण्याच्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. रशियामध्ये साथीच्या आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 226,353 झाली आहे, जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. हे पाहता, सरकारच्या मंत्रिमंडळाने असे सुचवले होते की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक आठवड्यासाठी सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.