Putin Gift to Kim Jong eSakal
ग्लोबल

Russian Gift to Kim Jong : पुतीन यांनी किम जोंग उनला पाठवलं खास 'रशियन' गिफ्ट काय आहे ? चक्क 'यूएन'चे नियमही तोडले..

UN restrictions on Russia and North Korea : संयुक्त राष्ट्रांनी रशिया आणि उत्तर कोरियामध्ये कोणत्याही प्रकारच्या घेवाण-देवाणीवर बंदी जाहीर केली आहे.

Sudesh

Vladimir Putin Gifts Russian Car to Kim Jong Un : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांना एक खास गिफ्ट पाठवलं आहे. या गिफ्टसाठी पुतीन यांनी चक्क संयुक्त राष्ट्रांच्या नियमांची देखील पर्वा केलेली नाही हे विशेष. पुतीन यांनी किम जोंग यांना एक रशियन बनावटीची कार गिफ्ट केली आहे. ही कार त्यांनी खासगी वापरासाठी दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांनी रशिया आणि उत्तर कोरियामध्ये कोणत्याही प्रकारच्या घेवाण-देवाणीवर बंदी जाहीर केली आहे. त्यात आता पुतीन यांनी गिफ्ट दिल्यामुळे यूएनच्या नियमांचं उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटलं आहे. (UN restrictions on Russia and North Korea)

केसीएनए या मीडिया एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पुतीन (Vladimir Putin) यांनी 18 फेब्रुवारीलाच ही कार किम जोंग (Kim Jong Un) यांना दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात किम जोंग हे रशिया दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुतीन यांच्या 'ऑरस लिमोसिन' (Aurus Limousine) या कारचं भरपूर कौतुक केलं होतं. यामुळे आता पुतीन यांनी अशीच कार किम जोंग यांना गिफ्ट केली असल्याचं म्हटलं जात आहे.

पुतीन यांनी नेमकी कोणती कार (Vladimir Putin Car) गिफ्ट केली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही कार ऑरिस कंपनीचीच असल्याचं म्हटलं जात आहे. या कंपनीच्या गाड्यांची किंमत सुमारे चार कोटी रुपयांपासून सुरू होते. एकूणच पुतीन यांनी आपल्या मित्राला अगदी महागडं गिफ्ट दिल्याची चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT