Russian_Prime_Minister_ 
ग्लोबल

एका रात्रीत पुतिन ठरले 'हिरो'; कणखर नेता म्हणून मिळवली ओळख

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

मॉस्को- सत्ता आणि व्यसन अशा वस्तू आहेत ज्या सुटता सुटत नाहीत. राजकारणी लोक सत्तेत राहण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करतात. कोणत्याही पद्धतीने सत्तेत राहणं हेच त्यांचं उदिष्ट असतं. याचीच प्रचिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे पाहिल्यावर येते. पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. एका कामगाराचे पुत्र ते रशियासारख्या बलाढ्य देशाचे सर्वोच्च नेता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा प्रवास थक्क करणारा राहिलाय. पुतिन यांनी लहानपणी एका सरकारी कार्यालयातून जाऊन गुप्तहेर बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोठं झाल्यानंतर त्यांनी ही इच्छा पूर्णही केली. एक माचो मॅन म्हणून पुतिन यांनी आपली प्रतिमा तयार केलीये. ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट, मार्शल आर्ट एक्सपर्ट असलेले ६८ वर्षीय पुतिन यांनी एका तरुणासारखं आपलं शरीर मेन्टेन ठेललंय.  राष्ट्राध्यक्षपदी पुतिन यांचा हा सलग दुसरा आणि एकूण चौथा कार्यकाळ आहे. राज्यघटनेनुसार त्यांना २०२४ मध्ये सत्ता सोडावी लागणार होती, पण आता घटना दुरुस्तीमुळे पुढील १५ वर्षे ते आपल्या पदावर कायम राहू शकतात. पुतीन यांनी गेल्या वर्षी देशातील नागरिकांकडून मतपत्रिका मागविल्या होत्या. त्यामध्ये त्यांना आणखी दोन कार्यकाळ सत्तेमध्ये राहण्याची मुभा देण्याबाबत नागरिकांनी मतं दिली होती. त्यानंतर या प्रस्तावाला रशियन संसदेनेही मान्यता दिलीये.

पुतिन यांचा थक्क करणारा प्रवास

पुतिन यांनी लॉमध्ये डिग्री घेतली आणि त्यानंतर सेक्युरेटी एजेन्सीमध्ये त्यांनी काम सुरु केलं. तेथेच ते केजीबी संस्थेच्या नजरेत आले. केजीबी ही तत्कालिन यूएसएसआरची गुप्तहेर संस्था. पुतिन केजीबीचे एजेंट बनले. १९८५ ते १९९० या काळात ते जर्मनीमध्ये गुप्तहेर होते.  सोविएत रशियाच्या पतनानंतर त्यांनी केजीबी सोडली आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात डेप्यूटी चीफ म्हणून रुजु झाले. याकाळात त्यांची अनेक श्रीमंत लोकांशी ओळख झाली. त्यांच्याच मदतीने पुतिन १९९९ मध्ये रशियाचे कार्यकारी पंतप्रधान बनले. २००० मध्ये निवडणूक जिंकून ते पहिल्यांदा राष्ट्रपती बनले. तेव्हापासून त्यांनी रशियावरील आपली पकड अधिक मजबूत गेलीये. २००८ पर्यंत ते सलग दोन वेळा राष्ट्रपती होते. पण, तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्याची तरतूद रशियाच्या संविधानात नव्हती. त्यामुळे ते पंतप्रधान बनले. 

पुढे २०१२ मध्ये ते पुन्हा अध्यक्ष बनले. त्यानंतर संविधानात दुरुस्ती करत अध्यक्षपदाचा पदाचा कार्यकाळ ४  वर्षांवरुन ६ वर्षे केला. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला असल्याने ते २०२४ पर्यंत अध्यक्ष राहतील. पण, नुकतेच त्यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केलीये, ज्यामुळे २०२४ नंतर रशियन राष्ट्राध्यक्ष आणखी दोन कार्यकाळ सत्तेत राहू शकतील. पुतीन यांनी दोन्ही वेळा विजय मिळविला, तर ते २०३६पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहतील. जर असं झालं, तर जोसेफ स्टॅलिन यांचा २५ वर्ष सत्तेत राहण्याचा रिकॉर्ड ते मोडीत काढतील. 

मॉस्को थिएटरच्या घडनेमुळे पुतिन बनले 'आयर्नमॅन' 

पुतिन २००० साली पहिल्यांदा अध्यक्ष बनले. त्यानंतर पुढीच्या दोन वर्षात घडलेल्या एका घटनेमुळे ते हिरो ठरले. २३ ऑक्टोंबर २००२ ला काही हल्लेखोरांनी मॉस्को शिएटरमध्ये घुसून लोकांना ओलीस ठेवलं. त्यांची मागणी होती की, रशियाने चचण्यामधून आपले लष्कर मागे घ्यावे, अन्यथा सर्व ओलीसांना मारुन टाकण्यात येईल. त्यावेळी पुतिन यांनी उलट हल्लेखोरांना ऑफर दिली की, त्यांनी सर्व ओलीसांना सोडून दिलं, तर त्यांना  जीवदान दिलं जाईल. तीन दिवसानंतर लष्कराने बिल्डिंगच्या आतमध्ये विषारी गॅस सोडली, त्यानंतर आतमध्ये शिरुन पाचही हल्लेखोरांना ठार केलं.  ७५० ओलीसांना वाचवण्यात आलं. ११८ लोकांचा यात मृत्यूही झाला. पुतिन यांनी यातून स्पष्ट संदेश दिला होता की, रशिया कोणत्याही परिस्थित स्वत:ला ब्लॅकमेल होऊ देणार नाही. यासाठी स्वत:च्या नागरिकांचा बळी देण्यालाही मागेपुढे पाहिलं जाणार नाही. रशियाच्या लोकांना पुतिन यांची ही भूमिका आवडली. एक कणखर नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT