क्राइम आणि कोर्टचे अनेक रोमांचक गोष्टी व्हायरल होत असतात. प्रत्येक देशात गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षाही दिली जाते. मात्र तुम्हाला जर कोणी सांगितले की कोणताही गुन्हा न करता एका व्यक्तीने तीस वर्षे कारागृहाची शिक्षा भोगली तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरंय. एवढंच नाही तर जेलमधून आल्यानंतर या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण चांगलचं चर्चेत आहे.
तीस वर्षे शिक्षा भोगून बाहेर आला
अमेरिकाच्या टेनेसी शहरातील हे प्रकरण आहे. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर अंगावर काटा येणारी त्याची जीवनकहानी सर्वत्र व्हायरल झाली. या व्यक्तीचे नाव क्लाउड फ्रांसिस गारेट आहे. 65 वर्षाचा असणारा गारेट टेनेसी शहरात रहायचा. काही महिन्यापूर्वी तो ३० वर्षांची शिक्षा भोगून जेल मधून बाहेर पडला. मात्र त्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला
तीस साल वर्षापूर्वी हा व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत घरी होता तेव्हा तिथे अचानक आग लागली. त्यावेळी त्याच्यावर आरोप करण्यात आला की त्याने स्वत:हून आग लावली होती. या घटनेत त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला होता. तो वारंवार म्हणायचा की त्याने ही आग लावली नाही. मात्र त्याचं कोणीही ऐकलं नाही. त्याला गुन्हेगार घोषित करण्यात आले आणि ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षेच्या शेवटच्या काळात या व्यक्तीच्या कुटूंबातील एकाने त्याच्या बाजूला साक्ष दिली आणि त्याला निर्दोष घोषित करत त्याची जेलमधून अखेर सुटका झाली. मात्र जेलमधून बाहेर येताच काही महिन्यात त्याचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.