Sandeep Pandey eSakal
ग्लोबल

Sandeep Pandey : सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडेंचा अमेरिकेच्या इस्राईलस्नेही धोरणाला विरोध; 'मॅगसेसे' पुरस्कार परत करणार

संदीप पांडे हे ‘सोशॅलिस्ट पार्टी’शी (इंडिया) संबंधित आहेत. त्यांनी अमेरिकी विद्यापीठांतून घेतलेल्या ‘मास्टर ऑफ सायन्सेस’च्या दोन पदव्याही परत करण्याचे ठरविले आहे.

Sudesh

Sandeep Pandey : ‘अमेरिका इस्राईलला शस्त्रविक्री करत असल्याने त्यांनीच दिलेले सन्मान हे स्वतःजवळ ठेवणे मनाला पटत नाही,’ असे सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडे यांनी आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे सन्मान परत करण्याची घोषणा आज केली . पांडे यांना २००२ मध्ये सन्मानाने गौरविण्यात आले होते. पांडे हे ‘सोशॅलिस्ट पार्टी’शी (इंडिया) संबंधित आहेत. त्यांनी अमेरिकी विद्यापीठांतून घेतलेल्या ‘मास्टर ऑफ सायन्सेस’च्या दोन पदव्याही परत करण्याचे ठरविले आहे.

मॅगसेसे सन्मानासाठी अमेरिकेतील ‘रॉकफेलर फाउंडेशन’ आर्थिक मदत करते. पांडे यांना ज्या श्रेणीतून हा सन्मान देण्यात आला होता त्याला ‘फोर्ड फाउंडेशन’कडून आर्थिक मदत केली जाते. ‘‘ इस्राईलने गाझामध्ये केलेल्या लष्करी कारवाईत २१ हजारांपेक्षाही अधिक नागरिक मरण पावले असून एवढे होऊन देखील अमेरिका इस्राईलला शस्त्र विक्री करताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये मी हे सन्मान ठेवू शकत नाही, त्यामुळेच मी ते परत करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे पांडे यांनी सांगितले.

त्या पदव्यांनाही नकार

पांडे यांनी सायरॅकस विद्यापीठातून ‘मॅन्युफॅक्चरिंग अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ या विषयात एम.एस्सीच्या दोन पदव्या घेतल्या होत्या. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ या विषयातून पी.एचडी केली होती. या सर्वच पदव्या त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका घ्यावी

‘‘अमेरिकेने ज्या पद्धतीने याआधी मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती तशीच भूमिका या संघर्षामध्येही घ्यायला हवी. पॅलेस्टिनी नागरिकांचे दुःख समजून घेण्यात त्यांना अपयश आले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर पॅलेस्टिनींचे सार्वभौम राष्ट्र तयार होणे गरजेचे असून त्याला संयुक्त राष्ट्रांची (यूएन) मान्यता मिळायला हवी,’’ असे आग्रही मत पांडे यांनी मांडले.

सार्वभौम राष्ट्र हवे

‘‘मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक सन्मान हा अमेरिकेमध्ये ठेवला जात असल्याचे माझे मत होते पण दुर्दैवाने, हे सगळे त्या देशाच्या आतच लागू होते असे खेदाने सांगावे लागेल,’’ असेही पांडे यांनी स्पष्ट केले. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली लष्कराच्या कारवाईला प्रोत्साहन देण्याचे काम हे अमेरिकेकडून सुरू आहे. पॅलेस्टिनींसाठी सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करणे गरजेचे असून हा संघर्ष संपुष्टात येण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळणेही आवश्यक आहे, असे पांडे यांनी नमूद केले.

‘हमास’ने निवडणूक जिंकून दाखविली

‘‘अमेरिकेने याआधीच अफगाणिस्तानला तालिबानकडे सोपविले असून अगदी सहजपणे हा भाग तालिबानी दहशतवाद्यांकडे देण्यात आला होता. येथे दहशतवादी सत्तेत आले तर सामान्य माणसांच्या हक्काचे काय होणार? याची पूर्ण कल्पना अमेरिकेला होती. याउलट परिस्थिती पॅलेस्टाईनमध्ये आहे, तिथे हमासने निवडणूक घेऊन ती जिंकूनही दाखविली आहे. इस्राईल देखील फारसा गांभीर्याने विचार करत दिसत नाही,’’ असे पांडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT