saudi arabia Prince Mohammed bin Salman silent on Pulwama attack 
ग्लोबल

पाकिस्तानची भीती खरी ठरली! सौदी अरेबिया-भारताच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु

Manoj Bhalerao

G-20 Summit:भारताचा पाहुणचार बघून सौदी अरेबियाचे पंतप्रधान प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी असे काही वक्तव्य केलं, ज्याचा विचार पाकिस्तानने स्वप्तातही केला नसेल. सौदीचे प्रिंस म्हणाले की, ' काही देशांना त्यांच्या देशात दहशतवादाला आश्रय देणे बंद करावं लागेल.

त्यांना अशा सर्व संघटना संपवाव्या लागतील. याशिवाय दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी लागेल. पाकिस्तानवर अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप होत आहे, मात्र हे आरोप त्यांनी नेहमीचं फेटाळले आहेत.

ओसामा बिन लादेनपासून मुंबई हल्ल्यातील दोषींपर्यंत सगळ्यांनाच पाकिस्तानात आश्रय मिळाल्याचा आरोप आहे. पण आता सौदी अरेबियानेच या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांच्या पैशाच्या जोरावर पाकिस्तान अनेक दशकं जिहादची फॅक्टरी चालवत होता.

आता पाकिस्तानपुढे पर्याय उरला नाही. दुसरं असं की, जेव्हा इस्रायलेसारखा देश अरब देशांना सोबत घेऊन युरोपमधून अरबस्तानमार्गे भारतापर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे, तेव्हा पाकिस्तान कोणत्या तोंडाने जगात इस्लाम धोक्यात असल्याचा नारा देणार?

सौदीने दिलेला निधी पाकिस्तानने दहशतवादासाठी वापरला-

शिया देश इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर सौदी अरेबियाने सुन्नीबहुल पाकिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. यासाठी 80 च्या दशकात तेथील मदरशांना आणि मौलवींना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यास सुरुवात झाली. 1971 मध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने हा निधी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याठी वापरला.

एकीकडे सौदी अरेबियासारखे देश पेट्रो डॉलरच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर आपली पकड प्रस्थापित करू पाहत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर आपल्या देशात वेड्या तरुणांची फौज तयार करण्यात व्यस्त होते. एकीकडे अफगाणिस्तानात रशियाशी लढण्यात आणि दुसरीकडे पाकिस्तानी तरुण काश्मिरच्या तथाकथित स्वातंत्र्य लढ्यात ते सामील झाले. (Latest Marathi News)

सौदी अरेबियाकडून मिळालेल्या पैशांचा वापर देशात सुधारणा करण्याऐवजी. दहशतवादाच्या बाबतीत जगाची डोकेदुखी बनलेल्या या देशाने आता सौदी अरेबियालाही डिवचायला सुरुवात केली आहे.

हा देश आता केवळ कटोरा घेऊन उभा आहे, परिस्थितीवर मात करण्याची त्यांची मानसिकता नाही, असे सौदीचे राज्यकर्तेही मानू लागले आहेत. त्यामुळे सौदीचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी भारतात येऊन पाकिस्तानचे कान टोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

एकीकडे सौदी अरेबियाला आता कट्टरतावादी पाकिस्तानचा नव्हे तर पुरोगामी भारताचा भागीदार व्हायचे आहे, असं ते स्पष्ट करत आहेत.

दुसरे म्हणजे सौदी अरेबिया आता आपल्या देशाचं चित्र बदलत आहे, त्यामुळे त्याला पाश्चिमात्य देश आणि चीनसारख्या स्वार्थी देशांच्या पाठिंब्याची गरज नाही, तर भारताबरोबर समान भागीदारीची गरज आहे. या सर्व भू-राजकीय परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

SCROLL FOR NEXT