New symptoms of Omicron sakal
ग्लोबल

दोन डोसनंतरही Omicron चा धोका; शास्त्रज्ञांना आढळली 2 नवीन लक्षणं

New symptoms of Omicron: युनायटेड किंग्डममधील (United Kingdom) काही संशोधकांना ओमिक्रॉनची दोन नवी लक्षणे आढळली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉनची दोन नवी लक्षणे (New symptoms of Omicron):

जगभरातील अनेक संशोधक सध्या कोरोना व्हायरसचं नवं व्हेरीयंट (New Variant of Corona) ओमिक्रॉनवर (Omicron) संशोधन करत आहे. ओमिक्रॉनला व्यवस्थित समजून संशोधक (Scientist) त्यातील प्रत्येक घटक डिकोड करण्यासोबतच त्याचा लोकांवर होणारा परिणामांचा (Effect on People) अभ्यास करत आहेत.

कोरोनानं सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक (worst affected countries) असलेल्या युनायटेड किंगडममधील (United Kingdom) एका संशोधकाने, ओमिक्रॉनची दोन नवीन लक्षणे (Two new symptoms of Omicron) ओळखली आहेत जी साधारणपणे कोरोना व्हायरसशी संबंधित नाहीत.

किंग्ज कॉलेज लंडनमधील जेनेटिक एपिडेमिओलॉजीचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांच्या म्हणण्यानुसार मळमळ (Nausea) आणि भूक न लागणे (Loss of appetite) ही ती दोन लक्षणे आहेत. “ज्यांनी कोविड-19 लस (Covid Vaccine) किंवा बूस्टर डोस (Booster Dose) घेतले आहेत अशांमध्येही काही लक्षणे आढळतात. त्यापैकी काहींना मळमळ, किंचित ताप, घसा खवखवणे आणि डोकेदुखी होते”, असे टिम स्पेक्टर याने express.co.uk ला सांगितले. युनायटेड स्टेट्समधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या मते, ओमिक्रॉनशी संबंधित काही सामान्य लक्षणे म्हणजे खोकला, थकवा, रक्तसंचय आणि सर्दी होय.

सिंगल सेल डायग्नोस्टिक कंपनी IncellDx मध्ये कार्यरत असलेले डॉ ब्रूस पॅटरसन, यांनी दावा केला आहे की, त्यांना यापूर्वीच्या व्हेरीयंटमध्ये एवढ्या प्रमाणात चव आणि वास कमी झाल्याचे आढळले नाही. त्यांच्या मते ओमिक्रॉन पॅराइन्फ्लुएंझा नावाच्या विषाणूसारखा दिसतो.

एका डॉक्टरांनी ओमिक्रॉन प्रकारांमुळे उद्भवणारे ‘टेलटेल चिन्ह’ उघड केले. ते म्हणजे रात्रीच्या वेळी खूप घाम येणे. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) चे डॉक्टर अमीर खान यांनी सांगितले की, “रात्री इतका घाम येतो की ज्यामुळे तुम्हाला उठून तुमचे कपडे बदलावे लागतील.”

कोरोनाचा नवा व्हेरीयंट Omicron हा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आला. आतापर्यंत तो 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. यामुळे जगातील अनेक प्रदेश आणि देशांमध्ये, विशेषत: युनायटेड स्टेट्स आणि यूकेमध्ये कोविड-19 संसर्गामध्ये वाढ झाली आहे.

दोन्ही देशांमध्ये, डेल्टाच्या जागी ओमिक्रॉन आता Sars-CoV-2 विषाणूचा प्रबळ प्रकार आहे. यूकेमध्ये दैनंदिन कोविड -19 प्रकरणे बुधवारी 183,037 वर पोहोचली, ज्याने दैनिक टॅलीमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT