किंग्जस्टन : ‘भारत हा बदलाच्या मार्गावर आहे. आमची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल म्हणजे सर्वांपासून विलग होणे नाही, तर संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी क्षमतांचा विकास करणे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज जमैका येथे केले. राष्ट्रपतींनी आज भारतीय समुदायाशी संवाद साधला. कोविंद म्हणाले की,‘‘भारताच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग नोंदविण्यासाठी सरकारतर्फे अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जमैकामधील भारतीयांनी या संधीचा फायदा घ्यावा.
लाखो लोकांना विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आम्ही तुमच्या सर्वांचे सहकार्य मागत आहोत. आत्मनिर्भर भारत ही सरकारची मोठी मोहिम आहे. स्वाबलंबनाकडे वाटचाल म्हणजे इतरांपासून विलग होणे नाही. उलट ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा आदर्श समोर ठेवून सर्व मानवजातीच्या विकासासाठी स्वत:च्या क्षमतांचा विकास करणे, हा त्याचा अर्थ आहे.’’
रस्त्याला डॉ. आंबेडकरांचे नाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ जमैकाची राजधानी किंग्जस्टन शहरातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले असून आज या रस्त्याचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या कार्याची माहिती देणारे फलकही येथे उभारण्यात आले आहे. भारतापासून इतक्या दूरवर असलेल्या देशातही देशाच्या या थोर सुपुत्राच्या कार्याची दखल घेतली जाते, याचा मला प्रचंड अभिमान आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.