Pakistan Attack on Iran eSakal
ग्लोबल

Pakistan Attack on Iran : पाकिस्तानच्या हल्ल्यात इराणमधील सात जणांचा मृत्यू; तीन महिलांचा समावेश - रिपोर्ट्स

Pakistan strikes against "terrorist hideouts" in Iran; यामुळे दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

Sudesh

Pakistan-Iran Tension : मंगळवारी इराणने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकला पाकिस्तानने आज प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताने इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागामध्ये हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर तीन मुली जखमी झाल्या होत्या. यानंतर पाकिस्तानने या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. तसंच, या हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही पाकिस्तानने इराणला दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूताला परत बोलावून घेतलं होतं. तसंच, इराणच्या राजदूतांना पाकिस्तानात परत न येण्याची ताकीद दिली होती. (4 Children, 3 Women Killed In Pak's Retaliatory Attack Against Iran)

आज पाकिस्तानने इराणवर हल्ला केल्याची माहिती त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. इराणमधील कित्येक दहशतवादी तळ या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आल्याचं पाकिस्तानने सांगितलं. तसंच या कारवाईत कित्येक दहशतवादी ठार झाल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे.

इराणमधील सिएस्तान-ओ-बलुचिस्तान या प्रांतात पाकिस्तानने हल्ले केले. बीएलए या इराणमधील दहशतवादी संघटनेचे तळ आपण उद्ध्वस्त केले आहेत, असं पाकिस्तानने स्पष्ट केलं. या ऑपरेशनला 'मार्ग बार सर्माचार' असं कोडनेम देण्यात आलं होतंं, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं. (attack on the Balochi group Jaish al-Adl's headquarters)

चीनचा मध्यस्तीचा प्रयत्न

दरम्यान, इराणच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आधीच ताणले गेले होते. मित्र राष्ट्र म्हणून चीन या दोन्ही देशांमध्ये मध्यस्तीचा प्रयत्न करत होता. मात्र आता पाकिस्तानने तडकाफडकी हल्ल्याचा निर्णय घेत, ऑपरेशन राबवलं असल्यामुळे चीनचे प्रयत्न वाया गेल्याचं स्पष्ट झालं आहे. इराणने अद्याप पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीच बिघडले असल्याचं दिसत आहे. (China's mediation efforts)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT