बिजिंग : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज एका भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जपानमधील नारा या शहरात घडली आहे. दरम्यान चिनी सोशल मीडियाकडून या हत्येची खिल्ली उडवण्यात आली आहे.
(Shinzo Abe Death News)
शिंजो आबे हे एका राजकीय व्यासपीठावर भाषण करत असताना त्यांच्यावर एकाने गोळीबार केला होता. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टोकियोचे माजी गव्हर्नर श्री योईची मासुझो यांनी ट्विट करत आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान टोकियोमध्ये हत्या आणि हिंसाचार होण्याच्या घटना तुलनेने कमी होतात. त्याचबरोबर राजकीय हिंसाचार खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत असतात. त्यामुळे माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे जपानला हादरा बसला आहे.
माजी पंतप्रधानांसोबत त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी तैनात होते आणि गोळीबार करणारा त्याच्यापासून काही अंतरावर होता. सुरक्षारक्षक असतानाही माजी पंतप्रधानावर हल्ला होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. दरम्यान या घटनेनंतर चिनी सोशल मीडिया जसे की, Weibo आणि WeChat या माध्यमांवर या हत्येची खिल्ली उडवण्यात आली होती. या घटनेविषयी चुकीचे आणि उपहासात्मक विनोद केले जात आहेत. अनेक लोक या प्रकरणावर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
चीन-जपान वाद हा जुना आहे. या दोन्ही देशांमध्ये पहिल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकरणांमुळे तणाव निर्माण होत असतो. काही नेटकरी या घटनेला 1937 मध्ये जपान चीनमध्ये झालेल्या युद्धाचा संदर्भ देत आहेत. तर काही जण या घटनेवर मीम्स बनवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.