Tulsa Police esakal
ग्लोबल

अमेरिका हादरलं : हॉस्पिटलच्या आवारात तरुणाचा गोळीबार, शूटरसह 4 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. खुलेआम गोळीबाराच्या घटना दररोज समोर येत आहेत. आता पुन्हा अमेरिकेतल्या तुलसा, ओक्लाहोमा (Tulsa, Oklahoma) येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये एका तरुणानं गोळीबार केलाय, यात तीन जणांचा मृत्यू झाला असून हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं समजतंय.

एएनआयच्या वृत्तानुसार, तुलसा हॉस्पिटलच्या (Tulsa Hospital) आवारात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात झालेल्या गोळीबारात शूटरसह चार जण ठार झाल्याचं तुलसा पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणाचा तपास सुरूय. सध्या तुलसा पोलिस (Tulsa Police) विभागानं ट्विटरवर माहिती दिलीय की, अधिकारी अजूनही सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल परिसराची झाडाझडती घेत आहेत. कॅप्टन रिचर्ड म्यूलेनबर्ग यांनी एबीसीला सांगितलं की, मेडिकल कॅम्पसमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीनं गोळीबार केल्याचा पोलिसांना फोन आला. अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांना काही लोकांना गोळ्या लागल्याचं आढळून आलं. त्यावेळी एका जोडप्याचा मृत्यूही झाला होता. गोळीबाराच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय, अशी माहितीही त्यांनी दिली.

अमेरिकेत मंगळवारीही पार्किंगच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तर, दोन जण जखमी झाले. याशिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या या घटनेनं संपूर्ण जग हादरलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT