पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेंच्या भीषण धडकेत कमीतकमी 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेंच्या भीषण धडकेत कमीतकमी 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. सर सयद एक्सप्रेस रेल्वे आणि मिलत रेल्वेमध्ये घोटकीतील रेती आणि दहारकी रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. अपघात भीषण असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. 30 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एएनआयने पाकिस्तान ARY न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ( At least 30 people died and several sustained injuries as Sir Syed Express train collided with Millat Express between Reti and Daharki railway stations in Ghotki)
दोन एक्सप्रेस रेल्वेंची समोरासमोर धडक झाली. त्यात तीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. मदत कार्य सुरु असून स्थानिक गावकरीही मदत करत आहेत. जवळपास 15 ते 20 लोक अजूनही रेल्वेखाली अडकल्याचं सांगितलं जातंय. रेल्वेला हटवण्यासाठी घटनास्थळी मोठी उपकरणे आणली जात आहेत. मिल्लत एक्सप्रेस रुळावरुन घसरली, त्यानंतर सर सयद रेल्वेने मिल्लत एक्सप्रेसला धडक दिल्याचं जिल्हा पोलिस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितलं. रेल्वे नेमकं कोणत्या कारणामुळे रुळावरुन घसरली याचे कारण समजू शकलेले नाही.
पाकिस्तानी माध्यमानुसार, अपघाताच्या चार तासांपर्यंत मदत पोहोचू शकली नव्हती. पाकिस्तान रेल्वे अधिकाऱ्यांनी आत्ताच यावर बोलण्यास नकार दिला आहे. काही जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जवळपास 100 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना अनेकदा घडत असतात. रेल्वे सुविधा सुधारण्याकडे सरकारचे दुर्लक्ष यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.