Divorced 
ग्लोबल

'सॉरी, चुकून तुमचा घटस्फोट झाला..' 21 वर्षांचं नातं 21 मिनिटात तुटलं; नेमकं काय आहे प्रकरण?

Got Divorced by Mistake: एका जोडप्याचे चुकून घटस्फोट करण्यात आला आहे. ऐकायला हे विचित्र वाटतंय पण अशी घटना घडली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगभरातील देशांमध्ये घटस्फोट घेण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. काही देशांमध्ये घटस्फोट घेण्याची प्रकिया सोपी आहे, तर भारतासारख्या देशामध्ये घटस्फोट घेणे कठीण आहे. पण, लंडनमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. एका जोडप्याचा चुकून घटस्फोट करण्यात आला आहे. ऐकायला हे विचित्र वाटतंय पण अशी घटना घडली आहे. (21 years relationship broke in 21 minutes)

आयशा वरदाग यांची लंडनमध्ये लॉ फर्म आहे. Vardags च्या सॉलिसिटरच्या एका चुकीमुळे सदर प्रकार घटला आहे. विलियम्स पती-पत्नी यांच्या लग्नाला २१ वर्ष झाले आहेत. पण, कोर्टाने अचानक त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. दाम्पत्य घटस्फोट घेणार होतं, पण विभक्त होण्याआधी आर्थिक सेटेलमेंट करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार होती. याच दरम्यान, त्यांना कल्पना नसताना घटस्फोट झाला आहे. (Sorry you got divorced by mistake)

कोर्टाचा निर्णय बदलण्यास नकार

दाम्पत्याचा २१ मिनिटात घटस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एका जोडप्याच्या आर्थिक सेटलमेंटच्या प्रकरणामध्ये वरदाग लॉ फर्मच्या क्लर्कने कॉम्प्युटर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून चुकून विलियम्स पती-पत्नीचे नाव सिलेक्ट केले. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. असे असले तरी कोर्टाने आपला निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे.

वरदागच्या प्रतिनिधीने सांगितले की, 'फर्मच्या एका वकिलाने एका जोडप्याच्या आर्थिक सेटलमेंट प्रकरणात अर्ज केला होता. पण, त्याच्याकडून ऑनलाईन पोर्टलवर चूक झाली. त्यामुळे तुर्तास तयार नसलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे.' फर्मला दोन दिवसांनी आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर फर्मकडून कोर्टाकडे आदेश रद्द करण्याची विनंती करण्यात आली. पण, कोर्टाने असं म्हटलंय की, अशा प्रकरणात अंतिम निर्णय देण्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारची चूक कशी होऊ शकते.

वरदाग फर्मने कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कॉम्प्युटरच्या चुकीमध्ये घडलेल्या प्रकारात लोकांना घटस्फोट देणे योग्य नाही. चूक अधोरेखीत केल्यानंतर कोर्टाने आमची बाजू समजून घ्यायला हवी होती. ऑनलाईन सिस्टिममध्ये झालेल्या चुकीमध्ये एखाद्याचा घटस्फोट होत असेल तर ते कितपत योग्य आहे. हा न्याय नाही, असं फर्मने म्हटलंय. (Global News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT