Floods In South Africa esakal
ग्लोबल

मोठ्या पुरामुळे आफ्रिकेत आपत्कालीन स्थिती, ४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

अनेक जण अद्यापही बेपत्ता असून ४० हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा (Cyril Ramaphosa) यांनी देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या भयानक पुरात जवळपास ४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. क्वाझुली नटाला या प्रदेशात अनेक जण अद्यापही बेपत्ता असून ४० हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. पंधरवाडापूर्वी आपत्कालीन स्थिती समाप्त झाल्याचे रामफोसा यांनी जाहीर केले होते. कोविड महामारीमुळे ही स्थिती गेल्या दोन वर्षांपासून लागू करण्यात आले होते. चार दिवस पाऊस झाल्याने पूर (Flood) आला. या मागील कारण हवामान बदल असल्याचे रामफोसा यांनी सोमवारी (ता.१७) सांगितले. (South African President Cyril Ramaphosa Declares National Disaster Due To Heavy Floods)

राष्ट्रपती म्हणाले, की जरी आपत्कालीन स्थिती गेल्या आठवड्यात क्वाझुली नटाला प्रदेशात जाहीर करण्यात आले, तरी पुरामुळे इंधन वाहिनी अन्नपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा फटका पूर्ण देशासह डर्बन, जे दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) मुख्य बंदर असून ते आफ्रिका (Africa) खंडातील सर्वात मोठे बंदर आहे. बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. मुसळधार पावसामुळे पुरात ती बेपत्ता झाली आणि भूस्खलनामुळे ४०० पेक्षा अधिक लोक मारले गेले. पुरामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. आफ्रिकेतील सर्वात व्यस्त डर्बन (Durban) बंदरातील वीज आणि पाणीपुरवठा सेवा विस्कळीत झाली आहे.

रामफोसा म्हणाले, प्रतिकूल हवामान स्थितीचा देशातील इतर भागांवर होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करणे गरजेचे होते. असंख्य रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधांचे झालेली पडझड दुरुस्त करण्याचे काम संरक्षण दलाकडे देण्यात आले आहे. रामफोसा म्हणाले, की राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर केल्याने संसाधने जमवता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT