बीजिंग - चीनच्या दक्षिण भागातील गुआंगडोंग प्रांतामध्ये अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे प्रचंड पूर आला असून अनेक गावे पाण्याने वेढली गेली आहेत. या प्रदेशात मागील अनेक वर्षांत एवढा मोठा पूर आला नव्हता. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान ४७ जणांचा मृत्यू झाला असून हजारो जण विस्थापित झाले आहेत.
गुआंगडोंग प्रांतातील बहुतांश भागांमध्ये मागील आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. नद्यांनी किनारे सोडले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने शेकडो घरे आणि रस्त्यांचे नुकसान झाल्याने अब्जावधी युआनचा फटका बसला आहे. पुराचे पाणी अनेक गावांमध्ये व शहरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे आणि दरडी कोसळल्याने आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. सरकारची बचाव पथके अडकलेल्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुराचा ५५ हजार जणांना फटका बसला आहे. गुआंगडोंग, फुजिअन या प्रांतांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक गावे दुर्गम भागात असल्याने तेथे मदत पोहोचण्यास विलंब होत आहे.
टोकाचे हवामान
चीनच्या उत्तर भागात उन्हाचे चटके बसत असताना दक्षिण भागात मात्र पूरस्थिती आहे. हवामान विभागाने उत्तर भागात उष्णतेसाठी आणि दक्षिण भागात पावसासाठी सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. पर्यावरणातील तीव्र बदलांमुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस असे प्रकार घडत आहेत. हरितगृह वायूंमुळे तापमानवाढ होत असून चीनमधूनच हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.