ग्लोबल

किम जोंग उनला दक्षिण कोरियाचे प्रत्युत्तर; तीन तासांत यशस्वी चाचणी

शरयू काकडे

सोल : उत्तर कोरियासोबत सुरु असलेल्या तणावपूर्ण वातावरणात दक्षिण कोरियाने बुधवारी पाणबुडीने लॉन्च केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ballistic missile) यशस्वी चाचणी केली. त्याचबरोबर, दक्षिण कोरिया हा अण्वस्त्रांशिवाय अशी प्रणाली विकसित करणारा पहिला देश बनला आहे तर प्रगत तंत्रज्ञानामध्ये जगातील सातवा देश ठरला आहे. त्यामुळे प्रादेशिक शस्त्रास्त्र शर्यतीची शक्यता वाढली आहे. दक्षिण कोरियाने शत्रू देश उत्तर कोरियाला प्रत्त्यूतर देण्यासाठी ही मिसाईल लॉन्च केल्याचे मानले जात आहे.

दक्षिण सैन्याने दिलेल्या माहितनुसार, अण्विक शक्ती असेलेल्या उत्तर कोरियाने समुद्रात दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर काही तासातच दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मुन जे ईन यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी पार पडली. या यशस्वी चाचण्यांमुळे दक्षिण कोरियाकडे आता कोणत्याही वेळी उत्तर कोरियाच्या चिथावणीला प्रतिसाद देण्यासाठी पुरेशी ताकद आहे" असे मून म्हणाले आणि आपल्या देशाला "उत्तर कोरियाच्या असममित शक्तीला दडपून टाकण्यासाठी" शस्त्रास्त्र कार्यक्रम वाढवण्याचे आवाहन केले.

प्रेसिन्डेशीअल ब्ल्यू हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाने नव्याने कार्यान्वित झालेल्या पाणबुडी आह्न चांग-होद्वारा पाण्याखालून क्षेपणास्त्र सोडण्यात आले आणि त्याचे लक्ष्य गाठण्यापूर्वी नियोजित अंतरही कापले.''

''आता सर्व देशांकडे SLBM क्षमतेची स्वतःची अण्वस्त्रे असल्याचे सिद्ध झालेले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्र्यानी सोलला भेट दिली. दक्षिण कोरियासाठी ही एक धोरणात्मक प्रगती आहे, जी त्यांच्या लष्करी क्षमतांना बळकट करते आहे, कारण उत्तर कोरियाकडून आंतरराष्ट्रीय निर्बंधाअंतर्गत अण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ( missile) प्रॉग्रम्समुळे असलेल्या धोक्याचा सामना करण्याचा प्रयत्न करीत आहे.''

दोन्ही कोरिया दरम्यान क्षेपणास्त्र शर्यत, आता हुकूमशहा किमने केली क्षेपणास्त्र चाचणी

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील संबध सुधारण्याऐवजी बिघडत जात आहेत. दोघांमध्ये मिसाईट टेस्ट करण्यासाठी स्पर्धा सुरु असून ती वाढतच चालली आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने दोन दिवासांपूर्वी नवीन क्षेपणास्त्राची चाचणी केली असून रेल्वे-बोर्न म्हटले जात असून एका एक रेल्वेवरुन ही मिसाईल लॉन्च केली होती. या मिसाईलला कोरिया बजेटमधील विश्वासनीय मिसाईल मानले जात आहे. जे फोटोज प्रसिध्द झाले तेव्हा त्यामध्ये फिकट हिरवा रंगाची मिसाईल वर जाताना दिसत आहे, जिला ट्रेनच्या (छप्पर) वरच्या भागावरून लॉन्च केले होते. उत्तर कोरियाच्या न्युज एजन्सी KCNA ने दिलेल्या माहितीनुसार, या मिसाईलची रेंज 800 किमी आहे. नॉर्थ कोरियाच्या एका समुद्री क्षेत्राला लक्ष्य केले गेले होते.

उत्तर कोरियाने टेस्ट यशस्वी झाल्याचा दावा केला असून धमकी वजा सुचनेच्या स्वरात सांगितले, की उत्तर कोरियाने आता अशी सिस्टिम तयार केली आहे जी त्यांना धमकवणाऱ्या कोणत्याही फोर्सवर प्रत्युतरी म्हणून हल्ला करु शकतो.''

योन्सेई विद्यापीठाचे प्राध्यापक जॉन डेलरी यांनी एएफपीला सांगितले की, ही खूपच विलक्षण वेळ आहे कारण आपल्याकडे एक नव्हे तर दोन कोरिया एकाच दिवशी बॅलेस्टिक मिसाईल लॉन्चिंग करुन चाचणी करत आहे. "या प्रदेशात शस्त्रांची शर्यत सुरू आहे हे यावरुन समजते, त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे.'' असेही ते यावेळी सांगितले.

साऊथ कोरिया अण्वस्त्र शक्ती नसलेला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्च करणारा पहिला देश

पाणबुड्डीद्वारा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्च करण्याची क्षमता असलेला आता पर्यंतचा अण्वस्त्र शक्ती असलेल्या देशांकडेच होती. जगातील अमेरिका, फ्रान्स, चीन, रुस, ब्रिटेन, भारत, पाकिस्तान हे अण्वस्त्र शक्ती संपन्न देश मानले जातात. याशिवाय इज्राईल आणि उत्तर कोरियाला अनधिकृतपणे अण्वस्त्र सज्ज देश मानले जाते.याव्यतिरिक्त दक्षिण कोरिया जमीनीवर आधारित हायपरसोनिक मिसाइल सिस्टम पर खूप काम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT