नवी दिल्ली- तुम्हाला एका साईन्स फिक्शन चित्रपटातील स्टोरी वाटेल, पण अमेरिकेच्या प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीच्या वैज्ञानिकांनी एक असा पालक बनवला आहे जो ईमेल करण्यास सक्षम आहे. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी नॅनोटेक्नॉलजीच्या मदतीने पालकला खास हेतूसाठी बनवलं आहे. हे पालक सेन्सरसारखे काम करते, जे स्फोटक पदार्थांचे अस्तित्व ओळखू शकते. वैज्ञानिकांनी सांगितलं की, पालक स्फोटक पदार्थांचे अस्तित्व जाणवल्यास त्याची सूचना वैज्ञानिकांना कोणत्याही माध्यमाशिवाय पोहोचवू शकते. हे पालक कसे काम करते ते पाहूया...
सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर ते संजय राऊत दिल्ली सीमेवर; महत्त्वाच्या बातम्या...
यूरो न्यूजच्या माहितीनुसार, एमआयटीच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, पालकला जमिनीत असणाऱ्या पाण्यामधील नायट्रोअरोमेटिक्सचा पत्ता लागल्यास पानात असलेले कार्बन नॅनॉट्यूब सिग्नल पाठवतील. हे सिग्नल इंफ्रारेड कॅमेरा पकडेल आणि वैज्ञानिकांना याचा अलर्ट पोहोचेल. नायट्रोअरोमेटिक्स एक कंपाऊंड असून तो स्फोटक सुरुंग खाणीमध्ये आढळतो. यात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. या टेक्नॉलजीला प्लांट नॅनोबॉयोनिक्स असं नाव देण्यात आलं आहे.
प्रोफेसर मायकल म्हणाले की, रोपट्यांची मुळं जमीनीत सर्वत्र पसरलेले असतात आणि ते जमीनीत असलेल्या पाण्याचे नमुने घेऊन पानांपर्यंत पोहोचत असतात. या शोधाचा उद्देश स्फोटकं असलेल्या ठिकाणांचा पत्ता लावण्याचा आहे. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, याचा उपयोग प्रदुषण आणि पर्यावरणीय परिस्थितींच्या आकलनासाठी करता येईल. झाडे आपल्या जवळपासचा अनेक डेटा ग्रहन करत असतात.
'शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी'; संजय राऊत दिल्ली सीमेवर
प्रोफेसर स्ट्रेनो म्हणालेत की, रोपटे खूप क्रियाशील असतात. आपल्याला कळण्याआधीच त्यांना कळतं की दुष्काळ पडणार आहे. त्यांना जमीनीत आलेल्या छोट्याशा बदलाचीही जाणीव होते. त्यांनी दिलेल्या केमिकल सिग्नलला योग्य मार्ग दाखवला तर, मोठ्या प्रमाणात महत्त्वाची माहिती गोळा केली जाऊ शकते. वैज्ञानिकांना आढळलंय की, पालकला कार्बन नॅनोशीट्समध्ये बदललं जाऊ शकतं आणि हे धातूने बनलेल्या आणि फ्यूल सेल्सला अधिक प्रभावी बनवण्याचे स्रोत बनू शकतात. मेटल एअर बॅटरी सध्या वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीला चांगला पर्याय ठरु शकते.
वैज्ञानिकांनी पालक निवडलं कारण यात आयर्न आणि नायट्रोजन असतं, जे उत्प्रेरकाची भूमिका निभावण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्व असते. अमेरिकी वैज्ञानिकांनी या शोधाला मानव आणि झाडांमधील संवादाच्या रुपात पाहात आहेत. भविष्यात या शोधाच्या मदतीमुळे अन्य द्वारे उघडू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.