नवी दिल्ली- आर्थिक संकट आणि राजकीय उलथापालथीनंतर श्रीलंकेमध्ये पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये डाव्या विचारसरणीच्या नॅशन पीपल्स पावर (NPP) पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. याचा अर्थ ते श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनतील. भारतासाठी ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. कारण, नवे राष्ट्रपती चीन समर्थक मानले जातात.
शेवटच्या मतांच्या नोंदणीनुसार अनुरा कुमारा दिसानायके यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे ते बहुमताच्या दिशेने जात असल्याचं स्पष्ट आहे. दिसानायके हे श्रीलंकेचे १० वे राष्ट्रपती बनतील. आर्थिक संकटातून निर्माण झालेल्या आंदोलनानंतर गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले होते. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती बनले होते. ते निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते.
दिसानायके हे कोलंबोचे खासदार आहेत. ते नॅशनल पीपल्स पार्टीचे नेतृत्व करतात. दिसानायके हे भारत विरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जातात. तसेच, ते चीनधार्जिणे आहेत. विशेष म्हणजे २०२२ मधील आर्थिक संकटानंतर दिसानायके यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. गरिबांचे नायक म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.
दिसानायके हे मार्क्सवाद आणि लेनिनवाद मानणारे नेते आहेत. त्यामुळे ते भारतासाठी त्रासाचे ठरणार आहेत. श्रीलंकेमधील गृहयुद्धावेळी भारताच्या हस्तक्षेपाला त्यांनी विरोध केला होता. याशिवाय, निवडणूक प्रचारानंतर ते म्हणाले होते की, सत्तेमध्ये आल्यानंतर श्रीलंकेतील अदानी ग्रुपचा २८४ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयल्प ते रद्द करण्याचा निर्णय घेतील.
दिसानायके यांचा पक्ष बंद बाजार आर्थिक नीतीचे समर्थन करते. पक्षाची विचारसरणी चीनच्या पक्षासारखी आहे. याशिवाय, चीनने देखील श्रीलंकेच्या मदतीसाठी तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेच्या आर्थिक संकटासाठी चीनच जास्त जबाबदार आहे. दरम्यान, श्रीलंकेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारमुळे तरी तेथे शांतता नांदेल याची अपेक्षा आहे.
दिसानायके यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६८ साली झाला आहे. ते AKD नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे सध्या दोन राजकीय पक्षांचे नेतृत्व आहे. पीपल्स लिबेरशन फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पावर (NPP) या पक्षाचे ते नेते आहेत. त्यांच्या जेपीवी पक्षाने १९८० मध्ये भारताने पाठवलेल्या शांतता करार फोर्सचा विरोध केला होता. त्यांनी अदानीच्या प्रोजक्टला विरोध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.