Sri Lanka Thanks to PM Modi esakal
ग्लोबल

Sri Lanka Thanks to PM Modi: का मानले श्रीलंकेने PM मोदींचे आभार? संकटग्रस्त देश भारतामुळे कसा परतला सामान्य स्थितीत

Sri Lanka Thanks to PM Modi: श्रीलंका ने पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौतुक केल. भारताने श्रीलंकेला कठीण काळात मदत केली आणि श्रीलंकेला त्यातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Sandip Kapde

Sri Lanka Thanks to PM Modi: श्रीलंका ने पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौतुक केल. भारताने श्रीलंकेला कठीण काळात मदत केली आणि श्रीलंकेला त्यातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला आम्ही मोठा भाऊ आणि भादगीदार म्हणून पाहतोय, असे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

श्रीलंकेत एक वेळ होती जेव्हा इंधन आणि औषधांसाठी लांबच लांब रांगा लागायच्या. आम्ही आर्थिक संकटात होतो, त्या काळात पंतप्रधान मोदींच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाने आम्हाला समस्यांमधून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत.

भारताचे परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्र्यांचेही आम्ही आभारी आहोत. भारतीय अर्थमंत्र्यांनी आमच्या मदतीसाठी आयएमएफशी नियमितपणे चर्चा केली होती. भारताच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही पुन्हा एकदा सामान्य स्थितीत परतलो आहोत, असे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री थरका बालसूरिया (Sri Lankan Foreign Minister Tharaka Balasuriya) यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

ते म्हणाले,  श्रीलंकेला 2048 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे श्रीलंकेला भारतासोबत भागीदारीत काम करायचे आहे. यासाठी श्रीलंकेने भारतीय कंपन्यांना श्रीलंकेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

भारताने आपला देश कसा बदलला हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. माझ्या मते, भारत 2047 पर्यंत विकसित देश होण्याच्या मार्गावर आहे. आपण विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. भारत आणि श्रीलंकेला एकत्र काम करण्याच्या अनेक संधी आहेत, असे थरका बालसूरिया यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

देशात पर्यटनाची भरभराट होत आहे. आम्ही बंदरांवर भर देत आहोत. श्रीलंकेत रिअल इस्टेट विकसित करणे. श्रीलंकेत अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपण बरेच चांगले करू शकतो. श्रीलंकेत प्रचंड खनिज क्षमता आहे.

खनिजांवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम ग्रेफाइट आहे. भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करतील, ज्यामध्ये ग्रेफाइट महत्त्वाचा आहे. आमच्याकडे सुमारे 30,000 ग्रेफाइट खाणी आहेत, ज्या भारतीय कंपन्यांना मदत करू शकतात, असे बालसूरिया यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT