Gotabaya Rajapaksa news | Sri Lanka Crisis 
ग्लोबल

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजेपक्षेंनी अखेर देश सोडला; मालदीवमध्ये दाखल

राजेपक्षे आजच देणार होते आपल्या पदाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : आर्थिक आरिष्ट ओढवलेल्या श्रीलंकेत अनागोंदी माजली असून नागरिक अजूनही संतप्त आहेत. नागरिकांची ही स्थिती पाहता राष्ट्रपती गोताबाया राजेपक्षे हे बुधवारी देश सोडून पळून गेले आहेत. ते मालदीवमध्ये पोहोचले असल्याची चर्चा आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे आजच ते आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. (Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flies out of the country)

राष्ट्रपती राजेपक्षे श्रीलंकेतून पळून गेल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होतं. पण ते श्रीलंकेतच असल्याचं निश्चित होतं, आपण पदाचा राजीनामा देणार असल्याच त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधांना कळवलंही होतं. त्यानुसार ते आज राजीनामा देणार होते. पण ते देशातून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत, ते कशा प्रकारे देशातून बाहेर पडले हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. यापूर्वी श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रपती राजेपक्षे यांचे लहान भाऊ बासिल राजेपक्षे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. पण एका विमानतळावरील अधिकाऱ्यानं त्यांना ओळखलं आणि त्यांना प्रवासासाठी परवानगी नाकारली.

श्रीलंकेत सध्या परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, अॅम्ब्युलन्स चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल शिल्लक राहिलेलं नाही. अॅम्ब्युलन्स सेवेनं नागरिकांना फोन न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सेवा देण्यास असमर्थ आहोत. लोकांना एकावेळचं अन्नही व्यवस्थित मिळेनासं झालं आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. डाळीच्या किंमतीत तीनपट वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, भूकबळी आणि कुपोषणाची समस्या निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT