shi jimping shi jimping
ग्लोबल

चीनची मुजोरी; श्रीलंकेला विषारी खत दिल्यानंतर दाखल केला खटला

हे जहाज आता सिंगापूरला पोहोचले आहे

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : चीनशी मैत्री वाढवणाऱ्या श्रीलंकेला (sri lanka) ड्रॅगनने मोठा धक्का दिला आहे. ड्रॅगनने प्रथम श्रीलंकेला विषारी सेंद्रिय खत (Toxic organic manure) दिले आणि ते घेण्यास नकार दिला. आता चिनी (china) कंपनीने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय लवादाची प्रक्रिया सुरू केली आहे. खतांचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रीलंकेसोबत कोणताही ‘वाजवी करार’ न झाल्याने चिनी कंपनी सिविन बायोटेकने हा खटला दाखल केला (Lawsuit filed) आहे. चिनी कंपनीने श्रीलंकेविरुद्ध खटला दाखल करणे ही एक दुर्मीळ घटना मानली जाते.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधून सुमारे २० हजार टन खत घेऊन श्रीलंकेत पोहोचलेले हे चिनी जहाज कोणताही मान्य करार न झाल्यास चीनला परतत आहे. हा वाद सोडवण्यासाठी चीनने खूप प्रयत्न केले. त्यांनी श्रीलंकेला धमकावण्याचाही प्रयत्न केला. परंतु, राजपक्षे सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. हे जहाज आता सिंगापूरला पोहोचले आहे. कंपनीने तेथे आंतरराष्ट्रीय लवादाची प्रक्रिया सुरू केली आहे. याद्वारे चीनला श्रीलंकेसोबतचा वाढता वाद सोडवायचा आहे.

श्रीलंका आणि चीनमध्ये सेंद्रिय खताबाबत राजनैतिक वाद (Political debate) सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे कारण देत श्रीलंकेने चीनकडून २०,००० टन सेंद्रिय खताची पहिली खेप स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या चीनने श्रीलंकेतील एका बँकेला काळ्या यादीत टाकले. श्रीलंकन ​​शास्त्रज्ञांचा एक गटही चीनकडून या खताला विरोध करीत आहे.

राजपक्षे यांच्या सरकारने श्रीलंकेला जगातील पहिला पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारा देश बनवण्याच्या प्रयत्नात रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घातली. त्यानंतर लगेचच श्रीलंका सरकारने चीनच्या सेंद्रिय खत उत्पादक कंपनी क्विंगदाओ सिविन बायो-टेक ग्रुपसोबत सुमारे ३,७०० कोटींना ९९,००० टन सेंद्रिय खत खरेदी करण्यासाठी करार केला होता.

खताच्या नमुन्यात हानिकारक जिवाणू

चीनचे हिप्पो स्पिरिट नावाचे जहाज २०,००० टन सेंद्रिय खत घेऊन सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत पोहोचले. श्रीलंकन ​​सरकारी एजन्सी, नॅशनल प्लांट क्वारंटाईन सर्व्हिसने शिपमेंट स्वीकारण्यास नकार दिला. कारण, खताच्या नमुन्यात हानिकारक जिवाणू आहेत. यामुळे बटाटे आणि गाजर यासारख्या श्रीलंकेतील जमिनीत उगवलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते.

९ दशलक्ष डॉलर देण्यापासून रोखले

खताच्या नमुन्यांच्या चाचणीत हे खत निर्जंतुक नसल्याचे दिसून आले आहे. शिपमेंटला श्रीलंकेत उतरण्याची परवानगी नसल्यामुळे, श्रीलंकेच्या सरकारी खत कंपनीला सरकारी मालकीच्या पीपल्स बँकेद्वारे मालासाठी ९ दशलक्ष डॉलर देण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयीन आदेश प्राप्त झाला, असे श्रीलंकेच्या कृषी विभागाचे महासंचालक डॉ. अजंथा डी सिल्वा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT