Stefan Mandel Sakal
ग्लोबल

Lottery Winner : नादखुळा भिडू! १४ वेळा जिंकली लॉटरी, अखेर समोर आलं सिक्रेट अन्...

अनेकांना लॉटरी खेळण्याचा नाद असतो. त्यात काहींचं नशीब फळफळतं तर काहींचा बाजार उठतो.

सकाळ डिजिटल टीम

Stefan Mandel Win Lottery Ticket 14 Times : अनेकांना लॉटरी लागली आणि रात्रीतून नशीब बदलंलं असे तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल. अनेकांना लॉटरी खेळण्याचा नाद असतो. त्यात काहींचं नशीब फळफळतं तर काहींचा बाजार उठतो.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का? की एखाद्या व्यक्ती नेमकी कितीवेळा लॉटरीचं तिकीट जिंकू शकते. एकदा दोन फार-फर तर तिनदा मात्र, असा एक अवलिया आहे ज्याने एक दोन वेळा नव्हे तर, तब्बल १४ वेळा लॉटरीचं तिकिट जिंकलं आहे.

नेमकी घटना कधीची?

ही घटना साधारण 1960 सालची आहे. या काळात रोमानियामध्ये कम्युनिस्ट राजवट होती. देशाची स्थिती अगदीच हालाखीची होती. वाढत्या बेरोजगारीमुळे उपासमार वाढली होती. यामुळे येथील तरूणवर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यात एक होता तो म्हणजे स्टीफन मँडल.

स्टीफनला नोकरी होती. मात्र, पैसे कमी मिळत असल्याने त्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बेरोजगारीमुळे अनेक तरूण गुन्हेगारीकडे वळले होते. मात्र, स्टीफनने चुकीचा मार्ग न निवडता आर्थिक संकटावर मात करता यावी यासाठी काहीतरी करायला हवं असा विचार केला.

त्यासाठी स्टीफनला एक युक्ती सुचली. त्यानुसार त्याने त्याचा मोर्चा लॉटरी क्षेत्राकडे वळवला. लॉटरी क्षेत्र असं आहे ज्यात नेमकं कुणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. पण अशा अनिश्चतेच्या क्षेत्रात स्टीफनची कल्पना काम करून गेली. विजयसाठी स्टीफनने कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न केला नाही तर यासाठी त्याने गणिताची मदत घेतली.

लॉटरी ते लॉटरी फर्मपर्यंतचा प्रवास

याबाबत मेल ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, स्टीफनने वापर केला. जिंकण्यासाठी त्याने सिस्टिम क्रॅक करण्यासाठी एक फॉर्मूला तयार केला. यात त्याला यश आले. रोमानियामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना स्टीफनने 5अंकी सूत्राने 6 व्या क्रमांकाचा अचूक अंदाज लावायला सुरुवात केली. याचा फायदा त्याला लॉटरीचं तिकिट जिंकण्यासाठी झाला. लॉटरीतील मोठ्या यशानंतर स्टीफन कुटुंबासह रोमानिया सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. इथेही त्याने त्याचा जुना फॉर्म्युला लॉटरीमध्ये वापरण्यास सुरूवात केली.

गणिती सूत्राच्या आधारावर स्टीफनने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल १४ वेळा लॉटरीच्या तिकिटे जिंकली, यानंतर ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांची नजर त्याच्यावर पडली. लॉटरीचं तिकिट जिंकण्यासाठी जरी स्टीफनने कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केले नव्हते. मात्र, त्याच्या या विजयाला ब्रेक लागावा यासाठी कठोर नियम करण्यात आले. त्यानुसार एका व्यक्तीने सर्व लॉटरीची तिकिटे खरेदी करणे बेकायदेशीर ठरविण्यात आले. यानंतर स्टीफनने पाच व्यावसायिक भागीदारांचा पाठिंबा मिळवला आणि गटातील सर्व लोकांना लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यास बंदी असताना या सर्वांनी लॉटरी फर्म स्थापन केली.

लॉटरी जिंकणारे सॉफ्टवेअरची निर्मिती

ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये लॉटरी खेळण्यावर अधिक अडचणी दिसू लागल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा अमेरिकन लॉटरीकडे वळवला. यात त्याने 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तचा पैसा कमावला. त्याने रोमानियामध्ये 1 ऑस्ट्रेलियामध्ये 12 आणि व्हर्जिनिया, यूएसएमध्ये सर्वात मोठा जॅकपॉट जिंकला. या प्रवासादरम्यान स्टीफनला यशादरम्यान तोट्यालाही सामोरे जावे लागले.

एकदा स्टीफन जिब्राल्टरमध्ये लॉटरी जिंकण्यात अयशस्वी ठरला तर, इस्रायलमध्ये त्याला यासाठी 20 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. सततच्या विजयानंतर अखेर लॉटरी जिंकण्याच्या स्टीफनच्या फॉर्म्युलावर बंदी घालण्यात आली. मात्र, आपण हा विजय गणिताच्या जोरावर करत असल्याचा ठाम विश्वास स्टीफनला होता. फॉर्मूलावर बंदी घातल्यानंतर स्टीफनने हार न पत्कारता स्टीफनने लॉटरी जिंकणारे सॉफ्टवेअरही तयार केले. या सॉफ्टेअरच्या मदतीने स्टीफन विजयी अंकांची जुळवाजुळव करत असे. यासाठी त्याने 16 जणांना कामावर ठेवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT