suez canal 
ग्लोबल

हुश्श! सुएझमध्ये अडकलेलं जहाज पुन्हा मार्गस्थ; 6 दिवसांनी सुटकेचा निश्वास

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सुएझ कालव्यात गेल्या सहा दिवसांपासून अडकलेल्या अवाढव्य अशा मालवाहतूक जहाजाने जगाची चिंता वाढवली होती. अखेर हे जहाज पुन्हा मार्गस्थ झालं असून जगाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. जगातील सर्वात मोठ्या मालवाहतूक कंटेनर जहाजांपैकी एक जहाज असलेल्या एवरगीवनने आशिया युरोपात वाहतूक होते. गेल्या सहा दिवसांपासून कालव्यात अडकलेलं हे जहाज अखेर निघालं आहे. जहाज अडकल्यानं दिवसाला ७० हजार कोटींहून अधिक फटका बसत होता. यामुळे जगभरातील व्यापाऱ्यांसह भारतीयांवरही परिणाम होत होता. दरम्यान, सुएझ कालव्यात खोळंबलेल्या इतर जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालुन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मोठ्या वादळामुळे कार्गो जहाज सुएझ कालव्यात अडकल्याचं सागंण्यात आलं होतं. जवळपास चार फुटबॉलच्या मैदानांइतकं मोठं असलेल्या या जहाजामुळे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये दीडशेहून अधिक जहाजे अडकली होती. या जहाजांवर 13 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची तर 10 क्रूड टँकरचा समावेश होता. याचा परिणाम अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरावरही झाला. 

पूर्व आणि पश्चिम जगातील महासागरांना सागरी कालव्याद्वारे जोडणारा सुएझ कालवा जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सुएझ कालव्यात मंगळवारी एव्हर गिव्हन हे जहाज जोरदार वादळामुळे कालव्याच्या एका किनाऱ्याला धडकून गाळात अडकले होते.  एव्हर गिव्हनवर जवळपास पाच हजार कंटेनर आहेत. त्यात पेट्रोकेमिकल्स, अन्नधान्य, द्राक्षे, औषधी रसायने यंत्रसामग्री आदींचा समावेश आहे.

कालव्याच्या मधोमध हे जहाज अडकल्याने भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि तसेच आखाती देशालगतच्या अरबी समुद्रात सुमारे 321 मालवाहतूक जहाजे पाच दिवसांपासून समुद्रातच उभी आहेत. सुएझ कालव्याच्या कोंडीने तूर्त दहा अब्ज डॉलरचा जागतिक व्यापार अडकून पडला असून प्रत्येक दिवशी हा आकडा वाढत चालला होता. आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापाराला ब्रेक लागला होता. 

गेल्या वर्षी 19 हजार जहाजांची वाहतूक 
सुएझ कालव्यातून गेल्या वर्षी तब्बल 19 हजार मालवाहतूक जहाजांनी व्यापार केला. जगाच्या एकूण व्यापारापैकी दहा टक्के व्यापार हा सुएझ कालव्यातून होतो. हा कालवा बंद पडल्याने आखाती देश आणि युरोप यांच्यातील पेट्रोल- डिझेल इंधनाची वाहतूक पूर्णपणे थांबली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT