Finger cutting Finger cutting
ग्लोबल

मृत व्यक्तींप्रति दुःख व्यक्त करण्यासाठी महिला कापतात स्वतःचे बोट

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास दानी जमातीत महिला दुःख व्यक्त करण्यासाठी हाताचे एक बोट कापतात

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. कोणी याचे समर्थन करतो तर कोणी विरोध. एकविसाव्या शतकात वावरताना अंधश्रद्धेचे समर्थन करता येणार नाही, असे म्हणणारे बरेच सापडतील. शिकले सवरले लोक अंधश्रद्धेच्या गोष्टी करतात यावरच अनेकांकडून आक्षेप घेतला जातो. असे असले तरी काही प्रथा आणि अंधश्रद्धा यावर विश्वास करणाऱ्यांची कमी नाही. इंडोनेशियामध्ये अशी एक जमात आहे, जिच्या प्रथेची नेहमी चर्चा होते. काय आहे ही प्रथा जाणून घेऊया...

एकविसावे शतक हे आधुनिक मानले जाते. इथे जुन्या परंपरा (Old tradition), चालीरीतींना जागा नाही, असे म्हटले जाते. परंतु, आजही जगात अशा काही जमाती आहेत ज्या विचित्र परंपरांचे पालन करीत आहेत. या परंपरांवर विश्वास ठेवणे खूप कठीण होते. परंतु, ते आपल्या संस्कृतीचा भाग मानत त्याचे पालन करीत असतात. कितीही प्रयत्न केले तरी यावर आळा घालता येत नाही.

इंडोनेशियामध्ये अशीच एक जमात आहे. या जमातीचे नाव दानी (Dani Jamaat) आहे. दानी जमात त्यांच्या भिन्न संस्कृती आणि विश्वासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या जमातीतील महिलांमध्ये स्वतःचे बोट कापण्याची विचित्र प्रथा आहे. यामुळे महिलांना भयंकर त्रास सहन करावा लागतो. हा सर्व प्रकार घडतो घरातील सदस्याचा मृत्यू (Women cut their own fingers to express grief) झाल्यानंतर... या प्रथेवर इंडोनेशिया सरकारने बंदी घातली आहे. तरीही येथील महिला त्याचे पालन करतात, असे सांगितले जाते.

आत्म्याला शांती मिळावी यासाठी...

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास दानी जमातीत महिला दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्या हाताचे एक बोट कापतात. एखाद्याच्या घरात चार सदस्यांचा मृत्यू झाला तर महिलेला चार बोटे कापावी लागतात. हे सर्व मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी केले जाते. तसेच व्यक्तीच्या मृत्यूनंतर झालेले दुःख बोट कापल्याच्या दुःखापेक्षा जास्त असल्याचे दाखवण्यासाठी असे केले जाते.

दानी जमातीमध्ये (Dani Jamaat) बोटाचा वरचा भाग कापण्यासाठी (Finger cutting) दगडापासून बनवलेल्या ब्लेडचा वापर कला जातो. काही प्रकरणांमध्ये बोट ब्लेडशिवायही कापले जाते. लोक बोट चावतात आणि मधून दोरीने घट्ट बांधतात. असे केल्याने रक्तप्रवाह थांबतो नंतर ते कापले जाते. इंडोनेशियातील जयाविजया प्रांतात या जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

(टीप : सकाळ माध्यम समूह या कृतीचे समर्थन करत नाही. तसेच याला प्रोत्साहन देत नाही. फक्त माहिती पोहोचवणे हाच उद्देश आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT