Singapore Development Sakal
ग्लोबल

Success Story: एकेकाळी झोपडपट्टी असलेल्या सिंगापूरचा आजचा विकास AC मुळे झाला

काय आहे सिंगापूरची यशोगाथा, जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

सिंगापूर या देशाचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर उंच उंच इमारती, रोजगार, प्रगती हे सगळं आलं असेल. आपल्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के जागा भारतीयांना देणाऱ्या या देशाचं भारताशी घट्ट नातं आहे. असं म्हटलं जातं की चौदाव्या शतकात सुमात्रा बेटांवरुन एक हिंदू राजकुमार शिकारीसाठी सिंगापूर बेटावर गेला होता. तिथल्या जंगलामध्ये त्याने सिहांना पाहिलं आणि त्या बेटाचं नाव सिंगापूर अर्थात सिंहांचं बेट असं ठेवलं.

अर्थात ही एक दंतकथा आहे. याबद्दल कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. पण सिंगापूरची खरी कथा वेगळीच आहे. दिल्लीहूनही लहान असलेला हा देश आज जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो. एसी अर्थात एअर कंडिशनरने सिंगापूरला इथपर्यंत पोहोचवलं आहे. कसं? जाणून घ्या सिंगापूरची यशोगाथा.

जगातली सर्वात गलिच्छ वसाहत होती सिंगापूर

आज सिंगापूर नागरिकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कन्सल्टिंग फर्म जुनिपर रिसर्च यांच्या हवाल्याने इंडिया टाईम्सने नमूद केलं आहे की दळणवळण, आरोग्य , सुरक्षा आणि उत्पादकतेतही सिंगापूर जगात सर्वात पुढे आहे. द इकोनॉमिस्ट मॅगझिनच्या २०१८ च्या सर्वेक्षणानुसार सिंगापूर गेल्या पाच वर्षांपासून जगातलं सर्वात महाग शहरही आहे. पण सिंगापूर पहिल्यापासून इतकं समृद्ध नव्हतं. सिंगापूरजवळ ना शेती करण्यासारखी जमीन होती, ना खनिज संपदा होती. एक काळ असा होता की या देशातले बहुतांश लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते आणि हा भाग जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गणला जात असे.

दुसऱ्या महायुद्धाचाही बसला फटका

भारत, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार प्रमाणेच हा देशही इंग्रजांच्या ताब्यात होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापूरला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं म्हटलं जायचं. कारण या भागात मोठ्या प्रमाणावर ब्रिटीश सेना राहत होती. १९४२ मध्ये जपानने सिंगापूरवर हल्ला केला आणि जपानने ब्रिटनला हरवलं. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी या पराभवाला ब्रिटनच्या इतिहासातलं सर्वात मोठं नुकसान असं संबोधलं होतं. सिंगापूरला मात्र प्रत्येक बाजूने हल्ला सोसावा लागला होता. १९४४-४५ मध्ये अमेरिकी विमानांनी जपानच्या ताब्यात असलेल्या सिंगापूरवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सिंगापूरवर मोठ्या प्रमाणावर बॉम्ब फेकण्यात आले, यामध्ये हा देश उध्वस्त झाला.

१९२३ मध्ये या देशातल्या नायकाचा जन्म झाला....

या देशाच्या यशामागे मुख्य वाटा आहे तो म्हणजे हॅरी ली उर्फ ली कुआन यी यांचा. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२३ मध्ये एका चिनी कुटुंबात झाला. त्यांनी १९५४ मध्ये त्यांनी पीपल्स अॅक्शन पार्टीची स्थापना केली आणि ते पक्षाचे महासचिव बनले. पुढचे ४० वर्ष ते याच पदावर होते. त्यांनी सिंगापूरला ब्रिटीशांच्या तावडीतून सोडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे त्यांनी सिंगापूरच्या विकासाचा विचार करून १९६३ मध्ये सिंगापूरला मलेशियामध्ये विलीन केलं. पण ही मैत्री फार काळ टिकू शकली नाही.

विलीनीकरणाच्या वेळी असं ठरलं होतं की सिंगापूर आपल्या कमाईचा ४० टक्के भाग मलेशियाला देईल. पण काही काळानंतर हे वाढवून ६० टक्के करण्यात आलं. पुढे वैचारिक आणि जातीय समुहांमधला संघर्ष वाढत गेला. त्यामुळे १९६५ मध्ये अखेर सिंगापूर स्वतंत्र देश बनला.

एअर कंडिशनर आणि सिंगापूरच्या विकासाचा काय संबंध?

सिंगापूरच्या विकासामध्ये एअर कंडिशनर म्हणजे एसीचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. सिंगापूरच्या स्वातंत्र्यामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले माजी पंतप्रधान ली कुआन यी यांनी हे म्हटलं आहे. सिंगापूरच्या यशामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिने मुख्य भूमिका बजावली होती? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, "एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनिंग आमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण संशोधन ठरलं. एअर कंडिशनिंगच्या शिवाय आपण केवळ सकाळी काही काळ किंवा संध्याकाळी काही काळ काम करू शकता. कारण हा सगळा परिसर उष्णकटिबंधीय आहे. मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे प्रशासकीय सेवा देणाऱ्या इमारतींमध्ये एअर कंडिशनर बसवून घेतले.

त्यानंतर पुढे सार्वजनिक ठिकाणीसुद्धा एसी बसवण्यात आले. या एअर कंडिशनर्समुळेच बाहेरची गुंतवणूक आणि व्यावसायिक सिंगापूरसारख्या देशाकडे आकर्षित झाले. अशा पद्धतीने सिंगापूरच्या विकासामध्ये एसी म्हणजे एअर कंडिशनरचा मोठा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT