Sudan Conflict Esakal
ग्लोबल

Sudan Conflict : सुदानमधील संघर्षांत बळींची संख्या 180 वर

भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं केलं आवाहन

अंकिता खाणे (Ankita Khane)

सुदानची राजधानी खार्तुम येथे बंडखोर निमलष्करी दले (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यानचा संघर्ष सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात सामान्य नागरिकांचा बळी जात असून आतापर्यंत या संघर्षांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या 180 इतकी झाली आहे, तसेच शेकडोजण जखमी झाले आहेत. अनेक सैनिक मृतावस्थेत दिसून आले आहेत, पण त्याविषयी अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अमेरिकेसह इतर देशांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर भारतीय दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीयांना घराबाहेर पडू नये असं सांगितलं आहे. सुदानमधील संघर्ष अजूनही कमी होताना दिसत नसल्यामुळे स्थानिक भारतीयांनी खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये तसेच शांत राहावे असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे.

अधिकृत माहितीनुसार सुदानमधील भारतीयांची संख्या साधारण चार हजार इतकी आहे. यापैकी १,२०० जण अनेक वर्षांपासून तिकडे स्थायिक झालेले आहेत. तर रविवारी गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या केरळी व्यक्तीच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे कारण परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. तर खार्तूममध्ये गोळ्या झाडण्यात आलेल्या भारतीयाच्या मृत्यूबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शोक व्यक्त केला आहे. या संघर्षामद्धे आतापर्यंत 180 नागरिक मारले गेले आहेत. याबाबतची माहिती 'अमर उजाला' या वृत्तपत्राने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT