न्यूयॉर्क - कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून लसीकरण मोहिमेवर जोर दिला जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असला तरी आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कोरोनाचे म्यूटेशन आणि नवीन स्ट्रेनही आढळल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात 50 संस्थांनी एकत्र येऊन एक सर्व्हे केला. यातून समोर आलेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत. कोरोना व्हायरसमधील म्यूटेशनमुळे कोरोना प्रतिबंधक लस ही 1 वर्षातच निष्प्रभ ठरेल असं संशोधकांनी म्हटलं आहे.
कोरोनापासून संरक्षण देणारी इम्युनिटी पॉवर मानवी शरीरात किती दिवस राहते, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर कितपत प्रभाव ठरेल असे अनेक प्रश्न सध्या जगासमोर आहेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या या सर्व्हेनं जगभराती लसीकरणाबाबत चिंता वाढवली आहे. म्यूटेशन पीपल्स व्हॅक्सिन अलायन्सने हा सर्व्हे केला आहे. 28 देशांमधील 77 साथरोग तज्ज्ञ, व्हायरॉलॉजीस्टपैकी दोन तृतियांश लोकांचे म्हणणे आहे की, कोरोनावरील लस एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत निष्प्रभ ठरू शकते. तर एक तृतियांश लोकांचे म्हणणे आहे की, लस नऊ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपर्यंत प्रभावी ठरेल.
तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण पुरेसं न होणं हेसुद्धा कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनचं एक मुख्य कारण आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसात धोका वाढू शकतो. ऑक्सफेम आणि युएनएड्ससह 502 हून अधिक संस्थांनी एक इशारासुद्धा दिला आहे. सध्या लसीकरण मोहिमेचा जो वेग आहे तो पाहता पुढच्या एक वर्षात गरीब देशांमध्ये फक्त दहा टक्के लोकांनाच लस दिली जाऊ शकेल. या देशांमध्ये लसीकरण कव्हरेज वाढवण्यावर भर दिला असून लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार करता येईल.
प्राध्यापक ग्रेग गोंन्साल्विस यांनी द गार्डियनशी बोलताना सांगितलं की, नवीन म्यूटेशन दररोज तयार होत आहे. कधी कधी अशी परिस्थिती असते की त्यांना आधीपेक्षा अधिक ताकद म्यूटेशनमध्ये तयार होते. ते आणखी वेगाने पसरतात. त्यामुळे आधीच्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणाऱ्या औषधाला, इम्युनिटी पॉवरलासुद्धा हे म्युटेशन निष्प्रभ ठरवतात.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जगात लसीकरणाची स्थिती
सध्या ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांनी त्यांच्या एक चतुर्थांश लोकसंख्येला एक डोस दिला आहे. तर दक्षिण आफ्रिका, थायलंड या देशांमध्ये एक टक्केसुद्धा लसीकरण झालेलं नाही. जगात अनेक देश असे आहेत जिथं अद्याप लसीकरण सुरू झालेलं नाही. गरीब देशांना लस पुरवणाऱ्या कोव्हॅक्स मोहिमेंतर्गत 2021 अखेरपर्यंत किमान 27 टक्के लोकांना लस मिळेल अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.