sweden ganeshotsav sakal
ग्लोबल

Sweden Ganeshotsav : स्वीडनमध्ये भक्तांची मांदियाळी; महाराष्ट्र मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव ठरला लक्षवेधी

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव यंदाही स्वीडन देशातील स्टॉकहोम शहरात मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरा झाला.

सकाळ वृत्तसेवा

स्टॉकहोम (स्वीडन) - दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव यंदाही स्वीडन देशातील स्टॉकहोम शहरात मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरा झाला. यंदाच्या गणेशोत्सवाला आठशेहून अधिक भक्तांनी हजेरी लावली. दरवर्षी वाढणारी गणेश भक्तांची संख्या सुखावणारी आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

विलोभनीय मूर्ती, सर्वांग सुंदर आरास यामुळे गणेश भक्तांचे डोळे भरून पावले. गणेश भक्तांचे, प्रामुख्याने महिलांचे स्वागत हळदी कुंकू आणि गृहोपयोगी भेटवस्तू देण्याने झाली. भारताचे स्वीडनमधील राजदूत तन्मय लाल यांच्यातर्फे सपत्निक गणेशाची स्थापना व आरती करण्यात आली.

गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे विविध कलागुणांचे झालेले सादरीकरण आणि त्यात असलेला आबालवृद्धांचा सहभाग वाखाण्याजोगा होता. मार्गम नृत्यकला संस्थेतर्फे ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणाचे सादरीकरण हे यंदाच्या वर्षाचे विशेष आकर्षण होते. मंगळागौरीच्या सादरीकरणात महिला वर्गाने अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेतला.

खास मराठमोळ्या रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल तर खवय्यांसाठी मोठी पर्वणीच होती. कार्यक्रमाची सांगता मराठमोळ्या पद्धतीने लेझीम आणि टाळ-मृदंगाच्या सोबतीत स्वीडन देशात पहिल्यांदाच स्वराज्य पथकाच्या ढोल-ताशाच्या गजरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीने झाली.

महाराष्ट्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी

जागतिकीकरण्याच्या कित्येक शतके अगोदर ‘विशात्मके देवे’ ही विश्वव्यापक संकल्पना मांडणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींकडून प्रेरणा घेऊन, "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे ब्रीद घेऊन स्वीडन देशात स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ करत असणारे कार्य नक्कीच कौतुकास्पद आणि मायभूमीपासून दूर वाढणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT